शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिरोंचातील पारंपरिक उर्सवर कोरोनाच्या भीतीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

येथे दरवर्षीप्रमाणे १२ ते १४ मार्चदरम्यान हजरत वली हैदरशाह, रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजनही मस्जिद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले, मात्र धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रमांना कोरोनो संसर्गाचा धोका टळेपर्यंत स्थगिती देण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथे दरवर्षीप्रमाणे १२ ते १४ मार्चदरम्यान हजरत वली हैदरशाह, रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजनही मस्जिद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले, मात्र धार्मिक बाब वगळता अन्य कार्यक्रमांना कोरोनो संसर्गाचा धोका टळेपर्यंत स्थगिती देण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून सदर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे उर्सच्या जत्रेवर कोरोनाच्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे.जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन सिरोंचा येथील उर्स जत्रेच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सदर उर्समध्ये उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे इत्यादी आवश्यक धार्मिक बाबी वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम करता येणार नाही. यात्रा, दुकाने, आकाशपाळणे लावता येणार नाही. स्वागत समारंभ, कव्वाली, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही. लोकांच्या जमावामुळे संसर्गाचा धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची अध्यक्ष मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी सिरोंचा यांनी खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.सिरोंचा येथे उर्स जत्रेकरिता येणाºया भाविकांनी खबरदारीचा उपाय म्हणून येथे येऊ नये असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये शेजारील तेलंगणा, छत्तीसगड राज्य तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनालाही जिल्हा प्रशासनाने याबाबत सूचना दिल्या आहेत.ट्रस्ट समितीच्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोडसिरोंचा येथे दरवर्षी होणाऱ्या या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणूनही या उर्सकडे पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात. त्याअनुषंगाने मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी व उर्स आयोजन समितीच्या वतीने महिनाभरापासून तयारी केली जात आहे. त्यामुळे उर्स नेहमीप्रमाणे आयोजित करण्याबाबत ट्रस्ट समितीचे पदाधिकारी आग्रही होते. परंतू तहसीलदार रमेश जसवंत यांनी कोरोनाचे सावट सांगत वेगळी भूमिका घेतली. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी सदर उर्सच्या ठिकाणी लोकांना जाण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. तसेच येथे होणाºया बºयाच कार्यक्रमांना परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजक समितीच्या पदाधिकाºयांसह भाविकांचा हिरमोड झाला. प्रशासनाच्या या निर्णयावर अनेक पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोनाurseउर्से