शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

कोरोना प्रवेशाने हिरावला बिनधास्तपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

ग्रिन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करताना जिल्ह्यातील व्यवहारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादा आणल्या आहे. काही दिवसांपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणारे व्यवहार आता दुपारी २ पर्यंतच सुरू राहणार असून रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा ऑरेंज झोनमध्ये : आजपासून दुकाने २ वाजेपर्यंतच राहणार, सलून पुन्हा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुंबईतून आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक क्वॉरंटाइन केलेले पाच जण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आल्याने गडचिरोली जिल्हा आता कोरोनाबाधित जिल्ह्यांच्या यादीत पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील नागरिक कोरोनापासून दूर असल्याने बिनधास्त होते. पण आता कोरोनाच्या प्रवेशामुळे जिल्हावासियांच्या व्यवहारातील बिनधास्तपणा हिरावला आहे. ग्रिन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करताना जिल्ह्यातील व्यवहारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादा आणल्या आहे. काही दिवसांपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणारे व्यवहार आता दुपारी २ पर्यंतच सुरू राहणार असून रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कुरखेडा तालुक्यातील ४ आणि चामोर्शी तालुक्यातील १ अशा पाच जणांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आणि बाहेरून आलेल्या प्रवाशांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.जिल्ह्यात सापडलेले पाचही रूग्ण दहीसर, मुंबई येथून दि.१६ ला आले आहेत. त्यांना आल्यापासूनच संस्थात्मक कॉरंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे बाहेरच्या सामान्य लोकांशी त्यांचा संपर्क आला नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पण आता पूर्वीपेक्षा प्रशासनाकडून थोडे कडक नियम लावले जाणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकाºयांनी चामोर्शी व कुरखेडा तालुक्यातील विलगिकरण कक्षास भेटी देऊन पाहणी केली.रेड झोनमधून येणाऱ्यांची माहिती द्यामुंबई, पुणे, नागपूर शहरांसारख्या रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला ०७१३२-२२२०३१ या क्र मांकावर कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले आहे. पोलीस विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यात यश आले होते. आता पुन्हा ग्रिन झोनमध्ये येण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.अंतर्गत बस प्रवास सुरू, आठवडी बाजार बंदजिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढलेल्या नवीन आदेशानुसार, जिल्ह्यातील अंतर्गत एसटी बसची प्रवासी वाहतूक, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यासह किराणा दुकाने, औषधी विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. पेट्रोल-डिझेलसाठी तहसीलदारांकडून परवाना घेण्याची आवश्यकता राहणार नाही.नवीन आदेशानुसार सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. याशिवाय सलून (केश कर्तनालय), खरेदी संकुले, निवासी हॉटेल्स, सर्व प्रकारचे कार्यक्रम, प्रार्थनास्थळे आधीप्रमाणे बंदच राहतील. याशिवाय आता केवळ दैनंदिन बाजार भरविण्यास परवानगी राहणार आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका- जिल्हाधिकारीपहिल्यांदाच कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्यामुळे सकाळपासून विविध अफवांना पेव फुटले होते. गडचिरोली शहराच्या रामनगर भागातही कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या अफवा सोशल मिडियावरून फिरत होत्या. पण जिल्ह्यातील कोरोनाबाबतची माहिती प्रशासन दैनंदिन स्वरूपात माध्यमांद्वारे प्रसिद्ध करत असते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरविणाºयांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या