शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कोरोनाबाधितांनी पार केला तीन हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

गडचिरोलीमधील १९ नवीन बाधितांमध्ये मारकबोडी १, आरमोरी मार्गावरील २, सीआरपीएफ कॉम्प्लेक्स ४, फुले वार्ड १, कोटगल १, लक्षमीनगर ४, नवेगावमधील १ आणि शहरातील इतर ठिकाणच्या ५ जणांचा समावेश आहे. अहेरीमधील १७ मध्ये शहरातील ६, रामपूर चौक १, मरपल्ली ६ जणांचा समावेश आहे. आरमोरी येथील सर्व ३ जण शहरातीलच आहेत. भामरागडमधील सर्व ८ जण स्थानिक आहेत.

ठळक मुद्दे१०० जण कोरोनामुक्त : नव्याने १०५ ची भर, गडचिरोलीसह देसाईगंज, अहेरी, एटापल्लीत वाढताहेत रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आटोक्यात येण्याऐवजी वाढतच आहे. शुक्रवारी पुन्हा १०५ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या ३०१२ झाली आहे. पहिल्यांदाच कोरोनाबाधितांच्या आकड्याने ३ हजारांचा टप्पा पार केला आहे.सध्या क्रियाशिल असणाऱ्या कोरोनाबाधितांपैकी वेगवेगळया तालुक्यातील १०० जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ८५९ झाली आहे. आतापर्यंत एकुण बाधित ३०१२ रूग्णांपैकी २१३२ जणांनी कोरोनावर मात केली, तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे.गडचिरोलीमधील १९ नवीन बाधितांमध्ये मारकबोडी १, आरमोरी मार्गावरील २, सीआरपीएफ कॉम्प्लेक्स ४, फुले वार्ड १, कोटगल १, लक्षमीनगर ४, नवेगावमधील १ आणि शहरातील इतर ठिकाणच्या ५ जणांचा समावेश आहे.अहेरीमधील १७ मध्ये शहरातील ६, रामपूर चौक १, मरपल्ली ६ जणांचा समावेश आहे. आरमोरी येथील सर्व ३ जण शहरातीलच आहेत. भामरागडमधील सर्व ८ जण स्थानिक आहेत. धानोरा येथील १३ मध्ये १० कटेझरी, १ सीआरपीएफ, १ पन्नेमारा, तर पेंढरी येथील एका जणाचा समावेश आहे.एटापल्लीच्या १९ जणांमध्ये ६ जण सीआरपीएफचे, ७ शहरातील, एलपीसी स्टाफ १, हेडरीमधील ५ जणांचा समावेश आहे. कोरची व कुरखेडा मधील प्रत्येकी एक जण स्थानिकच आहेत. सिरोंचामधील ८ मध्ये सर्वजण स्थानिक आहेत.देसाईगंजमधील १६ मध्ये राजेंद्र वार्ड १, पिंपळगाव १, चोप २, सीआरपीएफ ५, गांधी वार्ड १, कन्नमवार वार्ड १, कोंढाळा १, कुरु ड १ आणि माता वार्डमधील एका जणाचा समावेश आहे. येथेही आता रुग्णसंख्या वाढत आहे.तालुकानिहाय असे आहेत नवीन बाधितनव्याने बाधित झालेल्या १०५ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९ जण आहेत. याशिवाय अहेरी तालुक्यातील १७, आरमोरी ३, कोरची येथील १, कुरखेडा येथील १, देसाईगंज १६, एटापल्ली येथील १९, धानोरा १३, भामरागड येथील ८ आणि सिरोंचा येथील ८ अशा १०५ जणांचा समावेश आहे.यांनी केली कोरोनावर मातजिल्हाभरात शुक्रवारी १०० जणांनी कोरोनावर मात केली. त्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २८, अहेरी ११, आरमोरी १२, चामोर्शी १०, धानोरा ४, मुलचेरा २, सिरोंचा ७, कोरची ३, कुरखेडा ८, देसाईगंज ११ आणि एटापल्ली 4 अशा एकूण १०० जणांचा समावेश आहे.उपचार कोण करणार?कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील रुग्णालये कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांना गृह अलगिकरणात ठेवली जाणार आहे, मात्र हे करताना त्यांच्यावर उपचार कोण करणार, हे मात्र स्पष्ट नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या