शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

कोरोनाचा लसीकरणारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:32 IST

------ या मोहिमेत पहिल्या दिवशी लसीकरणासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. जिल्ह्यातील चार लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन ...

------

या मोहिमेत पहिल्या दिवशी लसीकरणासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. जिल्ह्यातील चार लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन १०० प्रमाणे दरदिवशी ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून लसीकरणाचा प्रारंभ केला. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील लसीकरण केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट दिली व केंद्राची पाहणी करून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.

लसीकरणाच्या प्रारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोलंके व इतर अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर जिल्हास्तरीय लसीकरणाचा प्रारंभ सकाळी १०.३० वाजता करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत परिचारिका सारिका दुधे यांना कोविशिल्डची पहिली लस देण्यात आली. लसीकरण केंद्रावर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कोविड-१९ ची लस घेण्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच केंद्रात हजेरी लावली होती. लसीबद्दल त्यांच्यात उत्सुकता आणि उत्साह दिसून येत होता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लस घेण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. लस घेताना डॉक्टरांचा उत्साह व प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.

लस घेतल्यानंतर डॉक्टरांनी अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मनात कुठलीही शंका न ठेवता नागरिकांनी येत्या काळात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घेतल्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज देण्यात आले होते. लाभार्थी केंद्रावर आल्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसवून समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर लाभार्थींना लसीकरण कक्षात नेऊन प्रत्यक्ष लस देण्यात आली. लसीकरण कक्षात त्यांना लस घेतल्यानंतरही कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्याच्या पद्धती, जसे मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सहा फुटांचे सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक असल्याच्या सूचना देण्यात आल्या. लसीकरणानंतर काही त्रास जाणवल्यास आपल्या एएनएम-आशा कार्यकर्ती, जवळचे आरोग्य केंद्र किंवा कंट्रोलरूमशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले. पुढील डोसची तारीख, वेळ आणि ठिकाण मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, असे चार संदेश समजावून सांगून लसीकरण करण्यात आले.

लसीकरणानंतर लाभार्थ्यास अर्धा तास निरीक्षण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येऊन व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले.

विविध कक्षांची उभारणी

जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, चामोर्शी आणि आरमोरी या चार लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. कुरखेडा येथील पाचवे लसीकरण केंद्र तूर्त रद्द करण्यात आले. लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली होती. केंद्राच्या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष उभारण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा देणाऱ्यांना लस देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच कोविन ॲपवर अपलोड करण्यात आली होती.

२८ दिवसांनंतर मिळणार दुसरा डोस

कोविशिल्ड ही लस लाभार्थ्यांना स्नायूमध्ये ०.५ मिली द्यावयाची असून, एका व्हायलमध्ये १० लाभार्थी लाभ घेणार आहेत. सध्या नोंदणी केलेल्या ९९६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. आठवड्याचे चार दिवस हे लसीकरण चारही केंद्रांवर सुरू राहील. याच लाभार्थ्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावयाचा आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यानंतर पुढच्या १४ दिवसांनंतर लस घेणाऱ्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार व्हायला सुरुवात होईल. कोरोनाची लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असल्याची सूचना यावेळी लस घेणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात आली.