आलापल्ली येथून सहा किमी अंतरावर असलेल्या खमनचेरू येथील नाल्यावर दोन वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे नाल्यामध्ये पाणी साचून राहण्यास मदत झाली आहे. शेकडो हेक्टर जमिनीला जलसिंचनाची सोय झाली आहे. पहिल्याच पावसात सदर बंधारा पाण्याने तुडूंब भरला. या पाण्याचा वापर करून धानाचे पऱ्हे वाचवित आहेत. काही शेतकऱ्यांनी तर रोवणीही सुरू केली आहे.
बंधाऱ्याने झाली सिंचनाची सोय :
By admin | Updated: July 20, 2015 01:48 IST