शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंडा येथे भाविकांसाठी सोईसुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:19 IST

श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे भरलेल्या महाशिवरात्री यात्रेसाठी जिल्हा परिषद यात्रा निधीतून प्राप्त झालेल्या १ लाख ७५ हजार रूपये मिळाले. तसेच मार्कंडादेव ग्राम पंचायतीला राज्य शासनाकडून १ लाख ६१ हजार रूपये इतके अनुदान तीन वर्षाचे मिळून प्राप्त झाले.

ठळक मुद्देपिण्याचे पाणी, अांघोळीसाठी शॉवर व अन्य सुविधा : ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाचा पुढाकार

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे भरलेल्या महाशिवरात्री यात्रेसाठी जिल्हा परिषद यात्रा निधीतून प्राप्त झालेल्या १ लाख ७५ हजार रूपये मिळाले. तसेच मार्कंडादेव ग्राम पंचायतीला राज्य शासनाकडून १ लाख ६१ हजार रूपये इतके अनुदान तीन वर्षाचे मिळून प्राप्त झाले. या निधीतून सदर यात्रेमध्ये भाविक व व्यावसायिकांसाठी विविध सोईसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.पंचायत समिती प्रशासनातर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराडा-फोकुर्डी बसस्टॉप रोडवर एक हजार लिटरच्या पाणी टाकीची व्यवस्था, स्टँड पोस्ट व्यवस्था, नदी किनाऱ्यावर भाविकांसाठी आंघोळीकरिता शॉवर व्यवस्था, महिलांसाठी नदी किनाºयावर चेजिंग रूम, महिलांसाठी मुत्रिघराची व्यवस्था करण्यात आली आहे. पं. स. प्रशासनातर्फे नदी किनाऱ्यावर व नदीपात्राचे स्वच्छता करण्यात आली आहे. यात्रा परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. यात्रा परिसरात २० तात्पूरते मुत्रिघर, ५० शौचालयालयाची स्वच्छता व्यवस्था, व्यावसायिकांसाठी रोडलगत जागा आखून देण्यात आली आहे. यासाठी २० ग्रामसेवकांची यात्रा व्यवस्थापनासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.बीडीओ गोविंद खामकर यांच्या मार्गदर्शनात यात्रा अधीक्षक डी. पी. भोगे हे यात्रेतील सोयीसुविधांकडे लक्ष ठेवून आहेत.१ लाख ६१ हजारातून सुविधामार्कंडा देव ग्राम पंचायतीला यात्रा काळातील सोयीसुविधांसाठी राज्य शासनाकडून तीन वर्षांचे मिळून एकूण १ लाख ६१ हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या निधीतून ग्रा. पं. प्रशासनाने यात्रेतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या जलशुद्धीकरण यंत्राची दुरूस्ती करण्यात आली. गावातील संपूर्ण पथदिवे सुरळीत करण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी नळजोडणी करण्यात आली. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या सर्व सोयीसुविधांवर शासनाकडून प्राप्त झालेला हा निधी खर्च केला जात आहे, अशी माहिती मार्र्कंडादेवच्या सरपंच उज्ज्वला गायकवाड, सचिव दिनेश सराटे यांनी दिली आहे. भाविकांना सोयीसुविधा पुरवून संपूर्ण यात्रा व्यसनमुक्त करण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनाने यंदा पुढाकार घेतला आहे.