शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीच्या वादात मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:11 IST

आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत युवक जागीच ठार झाला. सदर अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. घटनास्थळ नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दित येते, यावरून रेपनपल्ली व राजाराम पोलीस स्टेशनमध्ये वाद झाला. यामुळे मृतदेह जवळपास तीन तास जागेवरच पडून होता. पोलिसांच्या या कृत्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरेपनपल्लीजवळ अपघात : तीन तास मृतदेह उचलला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत युवक जागीच ठार झाला. सदर अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. घटनास्थळ नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दित येते, यावरून रेपनपल्ली व राजाराम पोलीस स्टेशनमध्ये वाद झाला. यामुळे मृतदेह जवळपास तीन तास जागेवरच पडून होता. पोलिसांच्या या कृत्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अजय चैतू कुम्मा (२४) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो भामरागड तालुक्यातील गुब्बागुडा येथील रहिवासी आहे. अजयला ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीसह अजय रस्त्यावरच कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह व क्षतिग्रस्त दुचाकी रस्त्याच्या अगदी मधोमध पडली होती. त्यामुळे ट्रकसारखी मोठी वाहने नेण्यास अडथळा निर्माण झाला होता. ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा केला.घटनास्थळ हे रेपनपल्लीपासून पाच किमी अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी घटनेची माहिती रेपनपल्ली पोलीस स्टेशनला दिली. रेपनपल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली. मात्र घटनास्थळ हे राजाराम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने आपण मृतदेह उचलणार नाही व पंचनामा सुध्दा करणार नाही, असा निर्णय घेऊन ते परत आले. त्यानंतर याबाबतची माहिती राजाराम पोलीस स्टेशनला देण्यात आली. राजाराम पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह उचलला. मात्र दोन पोलीस स्टेशनच्या या वादात मृतदेह जवळपास तीन तास घटनास्थळावरच पडून होता.पोलिसांच्या या असंवेदनशील वृत्तीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.