शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराला तेलंगणातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 01:35 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राथमिक संघटना तालुका शाखा सिरोंचाच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास झालेल्या...

शिक्षक संघटना आक्रमक : मुख्याध्यापकाला मारहाण केल्याचे प्रकरण सिरोंचा : महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राथमिक संघटना तालुका शाखा सिरोंचाच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास झालेल्या मारहाण प्रकरणावर आक्रमक पवित्रा घेऊन रविवारी सिरोंचा पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपी कंत्राटदारास तत्काळ अटक करा, अशी मागणी पोलीस निरिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीची दखल घेऊन सिरोंचा पोलिसांनी तेलंगणा राज्यातील महादेवपूर गावातून आरोपी कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा रा. रामंजापूर याला सायंकाळच्या सुमारास अटक केली. कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा याने नासिरखॉपल्ली जि.प. शाळेत स्वच्छतागृहाचे बांधकाम केले. या बांधकामाच्या प्रलंबित देयकासंदर्भात जाब विचारण्यासाठी कंत्राटदार तोटा हे शनिवारी शाळेत गेले. दरम्यान मुख्याध्यापक अग्गुवार व कंत्राटदार तोटा यांच्यात बाचाबाची झाली. राग अनावर झाल्याने कंत्राटदार राजन्ना तोटा याने मुख्याध्यापक रमेश अग्गुवार यांना बेदम मारहाण केली. तक्रारीवरून पोलिसांनी कंत्राटदार तोटा याच्या विरोधात भादंविचे कलम ३२३, २२४, ३५३, ३४२ अन्वये शनिवारी गुन्हा दाखल केला होता. कंत्राटदाराला महादेवपुरातून गाठले कंत्राटदाराच्या मारहाणीत जखमी झालेले नासिरखॉपल्ली जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रमेश अग्गुवार यांच्या तक्रारीवरून सिरोंचा पोलिसांनी रविवारी सायंकाळी ६ वाजता तेलंगणा राज्याच्या महादेवपूर गावातून मारहाण प्रकरणातील आरोपी कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा रा. रामंजापूर याला अटक करून सिरोंचा पोलीस ठाण्यात आणले.