शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कामांच्या दिरंगाईला कंत्राटदार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलची कामे घेताना नियमानुसार बांधकाम विभागाचा वाटा ६० टक्के आणि कंत्राटदाराचा ४० टक्के असा निधी बांधकामासाठी वापरण्याचा नियम घालून संबंधित कंत्राटदारांना परवानगी देण्यात आली होती. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने ४० टक्के निधीची उभारणी बँकेकडून कर्ज दाखवून केलेली किंवा स्वत:कडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा ठपका : अपूर्ण कामांबाबत सार्वजनिक बांधकामंत्र्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलअंतर्गत १६०० कोटीची कामे विविध कंत्राटदारांकडून सुरू आहेत. पण बहुतांश कामे अपूर्ण स्थितीत आहेत. यावर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलची कामे घेताना नियमानुसार बांधकाम विभागाचा वाटा ६० टक्के आणि कंत्राटदाराचा ४० टक्के असा निधी बांधकामासाठी वापरण्याचा नियम घालून संबंधित कंत्राटदारांना परवानगी देण्यात आली होती. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने ४० टक्के निधीची उभारणी बँकेकडून कर्ज दाखवून केलेली किंवा स्वत:कडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत. ही बाब यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या ना.वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता दशपुते, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील रस्त्यांची कामे संथगतीने सुरु असून दुरवस्था आहे. कंत्राटदार आपले पैसे वापरत नसल्याने कामे निकृष्ट होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची आणि दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावीत, असे निर्देश ना.वडेट्टीवार यांनी या बैठकीदरम्यान दिले. पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना ना.अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार