शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराने तेंदू पुड्याची उचल केलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:14 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येरमनार ग्रामपंचायतीमध्ये येणाºया येरमनार, गुर्जा खुर्द, मिचगुंडा, कोरेपल्ली व कौठाराम आदी पाच ग्रामसभांनी निर्णय घेऊन करारनामा करून कंत्राटदाराला तेंदू हंगामाचे काम दिले. येथे तेंदूचे संकलन पूर्ण झाले असून मजुरांची चार दिवसांची तेंदू संकलनाची मजुरी शिल्लक आहे.

ठळक मुद्देग्रामसभा अडचणीत : दुसऱ्या कंत्राटदाराला तेंदू पुडा विकणार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येरमनार ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या येरमनार, गुर्जा खुर्द, मिचगुंडा, कोरेपल्ली व कौठाराम आदी पाच ग्रामसभांनी निर्णय घेऊन करारनामा करून कंत्राटदाराला तेंदू हंगामाचे काम दिले. येथे तेंदूचे संकलन पूर्ण झाले असून मजुरांची चार दिवसांची तेंदू संकलनाची मजुरी शिल्लक आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराने तेंदू बोदची उचलही केली नाही. येत्या दोन दिवसांत कंत्राटदाराने मजुरी न दिल्यास दुसऱ्या कंत्राटदाराला तेंदूपत्त्याचे बोद विकणार, असा इशारा या पाचही ग्रामसभांनी दिला आहे.यासंदर्भात ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्यापुढे ही समस्या मांडली. यासंदर्भात येरमनारचे सरपंच बी.एस.गावडे, उपसरपंच पी.पी.तलांडी व सचिव एम.एन.हुलके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, सदर पाच ग्रामसभांनी २०१९ च्या तेंदू हंगामाचे काम सावली येथील अमन ट्रेडर्स गोलिबर यांना दिले. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व वकिलाच्या नोटरीसह १६ मे रोजी करारनामा केला. लगेच दुसऱ्या दिवशी १७ मे ला तेंदू संकलनाच्या कामास सुरूवात झाली. मात्र संबंधित कंत्राटदाराने कराराची मूळ प्रत ग्रामसभाकडे जमा केली नाही. तेंदू संकलनाची तीन दिवसाची मजुरी दिली. उर्वरित चार दिवसांची मजुरी शिल्लक आहे. याशिवाय पाणी, जमीन, लाईनिंग, पलटाई, झटकाई, बेलकटाई, फळीमुंशी, वाचर, चेकर, बोदभरती, बोदडुलाई आदींची मजुरी दिली नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत