सीआरपीएफचा पुढाकार : पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार धानोरा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११९ बटालियनच्या वतीने तालुक्यातील लेखा येथे सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. सदर पाणी टाकी बांधकामामुळे गावात उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. परिणामी गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक पाणी टाकीचे उद्घाटन सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपकमांडंट सपन कुमार, निरीक्षक साबुजी, निरीक्षक हरी रामायण, धानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, नवले, वडसन, धानोराच्या नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, लेखाचे सरपंच विनोद लेनगुरे, पोलीस पाटील झंझाळ, बाबुराव उईके, जयपाल उईके, मनीराम कुमोटी, देवराव हलामी, रंजन उईके, महेंद्र उईके, किशोर उईके, संजय हलामी, अजय हलामी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कमांडंट शिवशंकरा यांनी मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाला कन्हारटोला व लेखा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
लेखा येथे पाणी टाकी बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 01:47 IST