नगर परिषदेचा पुढाकार : १ ते ३० आॅगस्ट दरम्यान नोंदविता येणार आक्षेपगडचिरोली : २०११ साली करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाबाबतचे आक्षेप नोंदविण्यासाठी गडचिरोली शहरात सहा केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून या केंद्रांवर १ ते ३० आॅगस्ट दरम्यान आक्षेप नोंदविता येणार आहे. सर्वेक्षणावरील प्रारूप याद्या मार्च महिन्यात प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे शहरातील काही वार्डांच्या याद्या प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे प्रारूप यादीवर नागरिकांना आक्षेप नोंदविता आले नाही. या याद्या पुन्हा प्राप्त झाल्या असून त्यासाठी निश्चित केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी ज्योतीबा फुले वार्ड, सर्वोदय वार्ड, लांझेडा, रामपुरी वार्डातील नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. इंदिरा नगर, स्नेहनगर, कॅम्पएरिया, रामपूर तुकूम येथील नागरिकांच्या याद्या लांझेडा येथील संत जगनाडे महाराज विद्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. पंडीत जवाहरलाल नेहरू वार्ड, महात्मा गांधी वार्ड, सुभाष वार्ड, चंद्रपूर मार्गावरील नागरिकांच्या प्रारूप याद्या, राजीव गांधी नगर परिषद शाळा, कन्नमवार नगर, छत्रपती शिवाजी नगर, रामनगर, छत्रपती शाहू नगर येथील नागरिकांच्या प्रारूप याद्या उच्च श्रेणी नगर परिषद प्राथमिक शाळा, रामपुरी वार्ड येथे ठेवण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगर परिषद प्राथमिक शाळा कॉम्प्लेक्स येथे विसापूर वार्ड, स्मृती उद्यान नगर, सोनापूर वार्डातील याद्या उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा गोकुलनगर येथे झाशी राणी नगर, गणेश नगर, गोकुलनगर, चनकाईनगर येथील याद्या प्राप्त झाल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)
जात सर्वेक्षणावरील आक्षेप नोंदविण्यासाठी सहा केंद्रांची निर्मिती
By admin | Updated: August 1, 2015 01:15 IST