लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : तालुक्यातील सालमारा-वैरागड मार्गावरील पुलाचे बांधकाम मागील दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. परंतु मागील चार महिन्यांपासून सलग बांधकाम बंद असल्याने या मार्गाने ये- जा करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर मार्गाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केली आहे. माजी आ. आनंदराव गेडाम यांनी पुलाच्या बांधकामास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मागील दोन वर्षांपूर्वी सालमारा-वैरागड मार्गावरील पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. परंतु सदर काम अत्यंत संथगतीने सुरू राहिले. मागील चार महिन्यांपासून सदर काम बंद करण्यात आले. या मार्गाने नागरिक नेहमी ये- जा करतात. त्यामुळे या पुलाचे बांधकाम तत्काळ होणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. जोरदार पाऊस आल्यास पूर येऊन येथील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
सालमारा-वैरागड पुलाचे बांधकाम अर्धवट
By admin | Updated: July 2, 2017 02:07 IST