शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

बांधकाम ८० टक्क्यांवर पोहोचले

By admin | Updated: April 23, 2017 01:24 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाऱ्या कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर. जागेमध्ये

आरटीओ कार्यालयाची इमारत : आतापर्यंत ४ कोटी १९ लाख रूपये खर्च; तीन महिन्यांत होणार सज्ज दिलीप दहेलकर   गडचिरोली स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाऱ्या कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर. जागेमध्ये गडचिरोलीच्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत हे काम आता ८० टक्क्यांवर पोहोचले असून या कामावर आतापर्यंत ४ कोटी १९ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. येत्या तीन महिन्यांत अंतर्गत रस्ते, विद्युतीकरणासह येथील सर्व उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असून आरटीओ कार्यालयासाठी नवी इमारत सज्ज होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या बॅरेकमध्ये गडचिरोलीच्या आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याने येथे नव्या शिकाऊ परवानाधारकांची ट्रायल घेण्यास अडचण निर्माण होते. शिवाय आरटीओ कार्यालयाला अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी सोडवून आरटीओ कार्यालयाच्या कामात गती आणण्याच्या उद्देशाने शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये आरटीओ कार्यालयाच्या नव्या इमारतीला मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकानुसार आरटीओ कार्यालय इमारतीच्या कामास ६ कोटी १९ लाख ५८ हजार रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता शासनाने दिली. त्यानंतर काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली खासगी कंत्राटदाराकडून या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. सद्य:स्थितीत सदर आरक्षित जागेत आरटीओ कार्यालयाची मुख्य इमारत, सायकल, दुचाकी स्टँड, सुलभ शौचालय, संरक्षण भिंत तसेच प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण झाली आहेत. सदर इमारतीच्या कामासाठी सन २०१४-१५ वर्षात ८५.८१ लाख, २०१५-१६ मध्ये ८६.९६ लाख व सन २०१६-१७ मध्ये २४७.१२ असे एकूण ४ कोटी १९ लाख ८९ हजार रूपये प्राप्त झाले. इमारत बांधकामावर हा सर्व निधी खर्च करण्यात आला. आता सदर इमारतीचे विद्युतीकरण, फर्निचर, फायटनिंग, नागरिकांसाठी सुविधा, सायनेजेस तसेच सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करणे आदी कामे शिल्लक आहेत. सदर कामे लवकरच करण्यात येणार आहे. मात्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ गडचिरोलीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आरटीओ कार्यालयाची नवी प्रशस्त इमारत तयार झाल्यानंतर नव्या इमारतीत आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्यात येणार आहे. या ठिकाणी संगणकाची अद्यावत व्यवस्था, सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून नागरिकांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. नव्या इमारतीत आरटीओ कार्यालयाचा कारभार गेल्यानंतर प्रशासकीय कामकाजातही गती येणार आहे. २ कोटी ३० लाख हवे इमारतीचे विद्युतीकरण व इतर कामे करण्यासाठी आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाला २ कोटी ३० लाख रूपयांच्या निधीची गरज आहे. सदर निधी प्राप्त होण्यासाठी आरटीओ कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनस्तरावर पत्र व्यवहार व पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे ३१ मार्च २०१७ पूर्वी शासनाकडून १ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात सदर निधी खर्च करण्यात आला. कंत्राटदाराचे तीन-चार महिन्यांपासूनचे एक कोटीचे बिल प्रलंबित होते. ३१ मार्चपूर्वी निधी मिळाल्याने बिल अदा करण्यात आले. चामोर्शी मार्गावर होणार ब्रेक टेस्ट ट्रॅक शासनाने गडचिरोलीच्या आरटीओ कार्यालयासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या कामास मंजुरी प्रदान केली आहे. याअंतर्गत ६३ लाख २२ हजार रूपये खर्चास मंजुरी दिली आहे. सदर ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी चामोर्शी मार्गावरील गोंडवाना सैनिकी शाळेजवळ ३.४० हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक होणार आहे. सदर जागा आरटीओ विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हस्तांतरित झाली आहे. सदर कामासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या कामास प्रारंभ करण्यात येणार आहे.