शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

ग्राम पंचायतींचे बांधकाम रखडले

By admin | Updated: March 24, 2015 01:46 IST

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ ग्राम पंचायत इमारतीच्या बांधकामाला

गडचिरोली : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ ग्राम पंचायत इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. व त्याचा काही प्रमाणात निधीही प्राप्त झाला. मात्र उर्वरित निधी प्राप्त न झाल्याने या ग्राम पंचायतीच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६५ ग्राम पंचायती आहेत. यातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्राम पंचायती नक्षलप्रभावीत भागामध्ये येतात. नक्षल्यांचा लोकशाहीस विरोध आहे. त्यामुळे लोकशाहीचा एक महत्वाचा भाग असलेल्या ग्राम पंचायतीलाही नक्षल्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. परिणामी आजपर्यंत अनेक ग्रामपंचायतींची जाळपोळही झाली आहे. गावाच्या विकासाचे केंद्र असलेल्या ९४ ग्राम पंचायतींना स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यामुळे गावाचे महत्वाचे दस्ताऐवज भाड्याच्या कौलारू खोलीत ठेवावे लागत होते. पाऊस व उंदरांमुळे या दस्ताऐवजास धोका निर्माण झाल्याने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत १४ ग्राम पंचायतींना नवीन इमारत उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर केला. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीला १२ लाख रूपयांचा निधी प्राप्त करून दिला जातो. यामध्ये केंद्राचा वाटा ९ लाख रूपये व जिल्हा विकास निधीतून ३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यायचा होता. या अंतर्गत केंद्र शासनाचा प्रत्येकी ४.५ निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून काही ग्राम पंचायतींचे स्लॅब लेव्हलपर्यंत बांधकामही करण्यात आले आहे. उर्वरित बांधकाम मात्र निधी अभावी रखडले आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण जबाबदारी निभविणाऱ्या जिल्हा नियोजन व विकास समितीनेही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही रूपयाचाही निधी ग्राम पंचायत इमारतीसाठी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून जिल्हा नियोजन व विकास समितीच्या धोरणाविषयीही तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)नक्षल्यांच्या धमकीने गावकऱ्यांनी पैसे केले परत४भामरागड व एटापल्ली हे दोनही तालुके नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानले जातात. भामरागड तालुक्यातील धिरंगी, कुव्वाकोडी, नेलगुंडा ही अतिशय दुर्गम भागात असलेली गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायत इमारत मंजूर झाल्याचे नक्षल्यांना माहित पडताच त्यांनी गावकरी व ग्रामसेवकास ग्रामपंचायती इमारत न बांधण्याची धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या गावकऱ्यांनी बांधकाम सुरू केले नाही. एवढेच नाही तर प्राप्त झालेला ४.५ लाखांचा निधीही परत केला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता या गावांऐवजी कोरची तालुक्यातील सातपुती, अहेरी तालुक्यातील मद्दीकुंब व गडचिरोली तालुक्यातील गिलगाव या गावांची निवड केली असून त्या गावांमध्ये ग्रामपंचायतीचे बांधकाम केले जाणार आहे. जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींना मंजूर झाल्या इमारतीगडचिरोली तालुक्यातील राजोली, विहीरगाव, चामोर्शी तालुक्यातील ठाकरी, जैरामपूर, कोरची तालुक्यातील कोरची, मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा, अहेरी तालुक्यातील खमनचेरू, इष्टापूरदौड, भामरागड तालुक्यातील धिरंगी, कु व्वाकोडी, आरेवाडा, नेलगुंडा, एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना शासनाकडून इमारती मंजूर झाल्या आहेत.