शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

गोदामांचे बांधकाम रखडले

By admin | Updated: June 14, 2014 23:35 IST

आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी केलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यात १० गोदामांच्या निर्मितीसाठी शासनाने मंजुरी दिली होती. परंतु सदर गोदामाच्या बांधकामासाठी अजुनपर्यंत प्रशासनाकडे

आदिवासी विकास महामंडळ : १० गोदामांसाठी निधी उपलब्ध नाहीगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी केलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यात १० गोदामांच्या निर्मितीसाठी शासनाने मंजुरी दिली होती. परंतु सदर गोदामाच्या बांधकामासाठी अजुनपर्यंत प्रशासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत एकाही गोदामांचे बांधकाम करण्यास सुरूवात करण्यात आली नाही. आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत जिल्ह्यात उपप्रादेशिक कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून दुर्गम व अतिदुर्गम भागात विविध कार्यकारी सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य खरेदी करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यात अनेक प्रकारच्या खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक करण्याकरिता गोदामांची व्यवस्था नसल्याने अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नवीन गोदामांची निर्मिती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या मागणीनुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागाने जिल्ह्यात दहा गोदामांची निर्मिती करण्याची मंजुरी दिली. यासाठी ३९ कोटी ८६ लाख २२ हजार २८० रूपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला. परंतु प्रशासनाला मंजूर केलेला निधी अजुनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत खरेदी केलेले धान्य उघड्यावर ठेवावे लागत आहे. एटापल्ली, कुरखेडा, कोरची तालुक्यातील अनेक धान्य खरेदी केंद्र खरेदी केलेले धान्य उघड्यावरच ठेवत आहेत. त्यामुळे कोट्यावधी रूपयांच्या धानाची नासाडी होत आहे. (शहर प्रतिनिधी)