शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग भ्रष्टाचारात अव्वल

By admin | Updated: October 25, 2015 01:16 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम व सिंचन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात जेरबंद केले आहे.

१० महिन्यांत ३ अभियंते पकडले : एकाकडे आढळली अपसंपदागडचिरोली : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व सिंचन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात जेरबंद केले आहे. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत हा विभाग भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत विविध विकास कामांचा निधी खर्च केला जातो. या कामांचे तुकडे पाडून वेगवेगळ्या कंत्राटदारांना ही कामे दिली जातात. ग्राम पंचायतीच्या नावावर अनेक पदाधिकारी व अभियंतेही ठेकेदारी करीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक कंत्राटदारांची ऊठबसही दिसून येते. कोरची पंचायत समितीचा अभियंता अरविंद चव्हाण, आरमोरी पंचायत समितीचा शाखा अभियंता मनोज झेंबाजी मोटघरे व अलीकडेच धानोरा येथील प्रभारी उपविभागीय अधिकारी श्याम ऋषीजी सोरते यांना अटक करण्यात आली. मोटघरेकडे तर अपसंपदाही एसीबीला आढळून आली. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अभियंते एकाच जागेवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपातून कामांचे वितरण केले जाते. एक ते दीड वर्षांपूर्वी कोणत्या कामांचे नियोजन करायचे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापर्यंत धाव घेण्यात आली होती. कंत्राटदारीचे परिपूर्ण ज्ञान नसलेल्या लोकांना विकास कामे ठराविक रकमा घेऊन विकले जात आहे.ग्राम पंचायतीच्या नावावर अनेक ठिकाणी ग्रामसेवक, पदाधिकारी ठेकेदारी करीत आहे. गेल्या चार वर्षात गडचिरोली जिल्हा परिषदअंतर्गत झालेल्या रस्ते, नाल्या व सर्व बांधकामाची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी व या दोषी असणाऱ्या सर्व अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्हा बचाव कृती समितीने निवेदनातून केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)