शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी क्षेत्रात नद्यांवर बंधारे बांधा

By admin | Updated: November 18, 2016 01:25 IST

गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.

नियम ३७७ वर चर्चा : अशोक नेते यांची लोकसभेत मागणीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन नक्षलवादाची समस्या सुटण्यास फार मोठी मदत होईल. त्यामुळे नद्यांवर बंधारे बांधण्याची योजना हाती घ्यावी, अशी मागणी नियम ३७७ अंतर्गत खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली आहे.लोकसभेत निवेदन सादर करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, शासनाने आदिवासी बहूल क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी वनजमिनीचे वाटप केले आहे. मात्र सिंचनाअभावी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकला नाही. जोपर्यंत आदिवासी नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या वनजमिनीच्या सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येत नाही. तोपर्यंत त्यांच्या जमिनी पडिक राहणार आहेत. त्यांची आर्थिक उन्नती होऊ शकणार नाही. आज देशात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. नक्षलवादी वाढण्याचे मागासलेपण व अविकसीतपणा हे महत्त्वाचे कारण आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या अनेक उपनद्या आहेत. त्याचबरोबर मोठमोठे नाले सुध्दा आहेत. या उपनद्या व नाल्यांना आठ महिने पाणी राहते. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. लहान बंधारे बांधण्यासाठी केंद्रीयस्तरावर एक कार्यक्रम हाती घेण्यात यावा, बंधारे बांधल्यास येथील शेतीला आठ महिने सिंचन सुविधा उपलब्ध होईल. नागरिकांचा विकास झाल्यास नागरिक आपोआप नक्षलवाद्यांना धूडकावून लावतील. त्यामुळे केंद्र शासनाने बंधारे बांधण्याची योजना तत्काळ अंमलात आणावी, अशी मागणी लोकसभेला सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)वनपट्ट्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करणे गरजेचेगडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना वनपट्टे वाटप करण्यात आले आहेत. मात्र हे वनपट्टे सिंचनाच्या सोयीअभावी पडिक असल्याची बाब संसदेच्या लक्षात आणून दिली. मोठे सिंचन प्रकल्प उभे करणे जंगलामुळे अशक्य असल्याने नद्या व नाल्यांवर लहान बंधारे बांधल्यास वनपट्ट्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असाही मुद्दा खा. नेते यांनी उपस्थित केला.