शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जिल्हा निवड समिती बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना डावलले

By admin | Updated: November 16, 2016 02:10 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे

प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार : सूचविलेली उमेदवारांची नावे वाद्यांत येण्याची शक्यतागडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या पराभूत उमेदवार यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी या प्रकरणाची थेट तक्रार प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या बैठकीत समितीने निश्चित केलेल्या नावांवर आपला आक्षेप असल्याचे या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जिल्हास्तरावरून शिफारस झालेली नावे वाद्यांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १८ डिसेंबर रोजी गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर थेट नगराध्यक्ष व वार्डातील नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना संजय वानखेडे व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून गतवेळी पराभूत झालेल्या उमेदवार सगुणा पेंटाजी तलांडी यांना बोलविण्यात आले नाही. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. रवींद्र दरेकर यांनाही निमंत्रीत करण्यात आले नाही. या तीन प्रमुख नेत्यांना डावलून बैठकीने परस्पर नाव निश्चित केले आहे. या नावांना आपला आक्षेप असल्याचे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे व गडचिरोलीच्या पराभूत काँग्रेस उमेदवार सगुणा तलांडी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा निवड समितीने निश्चित केलेल्या नावांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची निवड समिती मुंबई येथे बैठक घेऊन विचार विनिमय करणार होती. मात्र आता दोन जबाबदार पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेणारी लेखी तक्रार नोंदविल्याने या प्रकरणी प्रदेश काँग्रेसस्तरावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. गणेश पाटील यांना विचारणा केली असता, मी सध्या बाहेर मुंबईतच आहे. काँग्रेसचे अखिल भारतीय उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या सभेची तयारी सुरू आहे. गडचिरोलीच्या निवडणुकीला वेळ आहे. ज्यावेळी उमेदवार निवडीची बैठक होईल. त्यावेळी या मुद्यावर लक्ष घातले जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)