शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी व कुरखेडात काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: August 7, 2015 01:19 IST

केंद्र शासनाने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. याविरोधात गुरूवारी अहेरी व कुरखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदन सादर : शासनाच्या विरोधात दिल्या घोषणाअहेरी/कुरखेडा : केंद्र शासनाने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. याविरोधात गुरूवारी अहेरी व कुरखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.अहेरी काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ललीत गेट प्रकरणातील ललीत मोदी यांना मदत करण्यात केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा हात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर व्यापम घोटाळ्यात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे प्रमुख असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली होती. मात्र केंद्र शासनाने काँगे्रस विरोधात डाव रचत सुमारे २५ खासदारांना निलंबित केले, असे म्हटले आहे. केेंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शन दिले. त्यानंतर नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांच्या मार्फतीने निवेदन सादर करून २५ खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, असे म्हटले आहे. यावेळी अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेबुब अली, शीला चौधरी, प्रशांत आर्इंचवार, उषा आत्राम, अरूण बेझलवार, व्यंकटेश चिलनकर, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बालाजी गावडे, हाजी जलीलुद्दीन काझी, ग्राम पंचायत सदस्य सलीम शेख, अरूणा गेडाम, अविनाश भोले, गणेश चापडे, बब्बू शेख, विलास जम्पलवार, सदाशिव गर्गम, कांता कोड्रावार, भीमबाई गद्दलवार, राशिदा शेख, अक्तर बानो, अंकु दब्बा यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.कुरखेडा - तालुका काँग्रेसच्या वतीने स्थानिक गांधी चौकात ११ वाजता केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, पंचायत समिती सभापती शामीना उईके, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, उस्मान खॉ पठाण, गिरीधर जनबंधू, माधव दहिकर, अविनाश डोंगरे, जयंत हरडे, अमोल पवार, सुभाष नैताम, कुरखेडाचे सरपंच आशा तुलावी, गुलाब डांगे, दीपक बागडे, यशवंत गावतुरे, राहुल बागडे, गणेश सिडाम, भास्कर मडावी, धर्मेंद्र मडावी, विमला हलामी, मनोज अंबादे, ईश्वर रमकेशर, तानू सहारे, ग्रा. पं. सदस्य सिराज पठाण, बन्नू हलामी, रोहीत ढवळे आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरूवारी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केले, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली आहे.