शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस घेणार बूथ कमिटीची निवडणूक

By admin | Updated: June 8, 2017 01:49 IST

जिल्ह्यात पक्षबांधणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून बुथ स्तरावर कमिटीची निवड करण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

पक्ष बळकटीकरणावर भर : जिल्हा परिषद सदस्यांची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात पक्षबांधणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून बुथ स्तरावर कमिटीची निवड करण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून निवडणूक कार्यक्रम पाठविण्यात आला. त्याची माहिती देण्यासाठी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या जि.प.सदस्यांची बैठक बुधवारी झाली. सदर निवडणुकीसाठी प्रत्येक बुथमधून २५ सदस्यांची नोंदणी करण्याबाबत सूचना देण्यात आली. हे सदस्य निवडणुकीसाठी मतदार म्हणून राहतील. बुथ कमिटीचे अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड ७ ते २० आॅगस्ट यादरम्यान होणार आहे. तत्पूर्वी सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया होणार आहे. या बैठकीत राज्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव व इतर मागण्यांबाबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठींबा दर्शवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीला जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार, मनोहर पोरेटी, अ‍ॅड. राम मेश्राम, रविंद्र मेश्राम, राजू जिवाणी, श्रीनिवास दुल्लमवार, संजय चरडुके, समित्राबाई लोहंबरे, कविता भगत, रुपाली पंदीलवार, वैशाली ताटपल्लीवार, वनिता सहाकाटे, प्रमोद भगत, संजय पंदीलवार व कार्यकर्ते हजर होते.