शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी काँग्रेसची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या जून महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण तयारीला लागले आहेत. भाजपसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादी आणि रिपाइंची आघाडी होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.काँग्रेसमध्ये सध्या देसाईगंजचे ...

ठळक मुद्देमोटवानी चर्चेत : आघाडीकडे अनेकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या जून महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण तयारीला लागले आहेत. भाजपसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादी आणि रिपाइंची आघाडी होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.काँग्रेसमध्ये सध्या देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसामल मोटवानी यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. भाजपमधून पुन्हा स्वगृही परतलेले माजी खासदार नाना पटोले यांचे ते निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्या नावाची फिल्डिंग वरिष्ठ स्तरावर लावली जात असल्याची चर्चा आहे.२००६ च्या विधान परिषद निवडणुकीत मोटवानी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. आपली ३० वर्षातील राजकीय कारकिर्द आणि नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळातील कामांमुळे पक्षश्रेष्ठी नवीन संधी देतील असा त्यांना विश्वास आहे. दुसरीकडे भाजपकडून हिंगणघाटचे व्यापारी जगदीश मियाणी हे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.काँग्रेस-राष्टÑवादी-रिपाइंची आघाडी झाल्यास आपण पूर्ण ताकडीने लढून विजय खेचून आणू शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश झाल्यास ही निवडणूक लढण्यास तयार आहे.-जेसामल मोटवानी,माजी नगराध्यक्ष, देसाईगंज