शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीविरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोरण राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोजगार निर्मितीबाबत शासनाकडे कोणतेही ठोस नियोजन नाही.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसकडून निदर्शने : केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने रोजगाराची साधने निर्माण करावी या मागणीसाठी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष कुनाल राऊत यांच्या नेतृत्वात गडचिरोली काँग्रेच्या वतीने निदर्शने देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविले आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोरण राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोजगार निर्मितीबाबत शासनाकडे कोणतेही ठोस नियोजन नाही. खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भारत सरकारच्या विविध खात्यांमध्ये सचिव पदावर नियुक्त केले जात आहे. डिजीटल इंडिया, कौशल्य विकास योजना अपयशी ठरल्या आहेत. केंद्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये १० लाख जागा रिक्त असताना नोकर भरतीवर बंदी घातली आहे. रस्ते, मंदिरे व पुतळे बनविण्यावर शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. रोजगार वाढीसाठी शासनाने प्रयत्न करावे असे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजीत सिंह, सचीव आसीफ शेख , डॉ. प्रणित जांभूले, निलेश खोरगडे, पीयुष वाकोडीकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, डॉ. चंदा कोडवते, पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर, विश्वजीत कोवासे, गौरव अलाम, गौरव येनप्रेड्डीवार, डॉ.मेघा सावसाकडे, रामेश्वर शेंदरे, नरेंद्र गजपुरे, उमाकांत हारगुळे, अभय नाकाडे, रजनिकांत मोटघरे, अमर नवघडे, इरशाद शेख आदी उपस्थित होते.कुणाल राऊत यांचे शहरात आगमन झाल्यानंतर गांधी चौकातील रेस्टहाऊस ते काँग्रेस कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीcongressकाँग्रेस