शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कमलापूर-पातानीलच्या हत्तींना थांबविण्यासाठी काँग्रेसची गांधीगिरी, मानवी साखळी आणि ठिय्या आंदोलनातून वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 18:09 IST

Elephants News: राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींचे गुजरातमधील जामनगरच्या संस्थेला हस्तांतर करू नये, आणि हा हत्ती कॅम्प वाचवावा यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कमलापूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.

गडचिरोली - राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींचे गुजरातमधील जामनगरच्या संस्थेला हस्तांतर करू नये, आणि हा हत्ती कॅम्प वाचवावा यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कमलापूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करून नारेबाजी करण्यात आली. तसेच एक दिवशीय धरणे देण्यात आले.कमलापूर व पातानील येथील हत्ती कॅम्प हे जिल्ह्याचे वैभव आहे. अनेक वर्षांपासून हत्तींचे येथे वास्तव्य आहे. त्यांच्यामुळे आजपर्यंत कुठल्याही मानवास हानी झाली नाही. शिवाय या हत्तींच्या वास्तव्याने कमलापूरला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे येथील हत्तीचे स्थलांतर करून हे हत्ती जामनगर (गुजरात) येथील खासगी प्राणी संग्रहालयात नेणे ही बाब योग्य नाही. त्यामुळे कमलापूर वाचवण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनात महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, विमुक्त भटक्या जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, एटापल्ली तालुकाध्यक्ष संजय चरडूके, नगरसेवक निजाम पेंदाम, मोहन नामेवार, आकाश परसा, अक्षय भोवते, हरबाजी मोरे, संजय चन्ने, वसंत राऊत, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मुनघाटे, अंकुश गाढवे, सुधीर बांबोले, रजाक खान, किसन हिचमी, मनोहर बोरकर, अमर गाढवे, संतोष मडावी, नागाजी कोरत, रामेश्वर, देवानंद गावडे, तानाजी दुर्वा, लालसू, भुजनगराव तोडसाम, रंगा गावडे, रवी कुमरे, चरणदास गावडे, विठ्ठल तोडसाम, माधव पोटावी, लकमु गावडे, मुटयालू गावडे, सुरेखा कामसे, फुलाबाई मडावी, कमलाबाई मडावी यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते व गावकरी सहभागी झाले होते.