शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आलापल्लीत काँग्रेसचा मेळावा

By admin | Updated: September 21, 2015 01:24 IST

स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

अनेकांचा प्रवेश : पक्ष मजबूत करण्याचे आवाहनआलापल्ली : स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सदर मेळाव्याचे आयोजन विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस प्रदेश कार्यकारीणी सरचिटणीस सगुणा तलांडी, माजी आमदार पेंटारामा तलांडी, अ‍ॅड. राम मेश्राम, प्रभूदास आत्राम, मनोहर हिचामी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ऋषी पोरतेट, संजय चरडुके, निलेश राठोड, विजय कोलपाकवार, मालू बोगामी, मुस्ताक हकीम, चंदू बेझलवार, स्वप्नील श्रीरामवार, सलिम शेख, अज्जू पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार यांनी या भागात प्रचंड प्रमाणात मागासपणा असून काँग्रेस सत्तेत आल्यास मागसपणा दूर करण्यासाठी आपण हा भाग दत्तक घेऊ. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून प्रचंड मतांनी निवडून दिले. परंतु १८ महिन्यांच्या काळात त्यांनी काहीही केले नाही. सूरजागड प्रकल्प सुरू झाला तर प्रकल्प येथेच उभारावा, अशी आपली ठाम भूमिका आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. मेळाव्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील पाच, एटापल्ली २०, मुलचेरा तीन, भामरागड १०, अहेरी तालुक्यातील १० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन संतोष आत्राम यांनी केले. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी वडेट्टीवार यांना विचारले असता, सदर निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)