शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:21 IST

एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने गुरूवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.

ठळक मुद्देएटापल्लीत धरणे आंदोलन : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी द्या

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने गुरूवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.शेतमाल उत्पादनात ६० टक्के घट झाली असल्याने एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, शेतकºयांना एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, जबरानजोत शेतकºयांचे प्रलंबित वनहक्काचे दावे निकाली काढावे, जारावंडी, कसनसूर ते एटापल्ली रस्त्याचे मजबुतीकरण करावे, कांदळी रस्त्यावरील पूल व जुरी नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला निधी उपलबध करून द्यावा, एटापल्ली ते जारावंडी मार्गावरून बस सुरू करावी, पिपली बुर्गी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तत्काळ सुरू करावे, जारावंडी येथे राष्टÑीयकृत बँकेची शाखा सुरू करावी, शेतीविषयक योजनांच्या लाभाकरिता अनुसूचित जमातीच्या शेतकºयांसाठी लागू केलेली जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथील करावी, आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके यांनी केले. यावेळी शालिकराम गेडाम, सरपंच सुधाकर टेकाम, शामल मडावी, सुनंदा ईके, रमेश गंप्पावार, हरिदास टेकाम, दिलीप दास, उषा ठाकरे, ज्ञानेश्वर रामटेके आदी उपस्थित होते.