शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासनाविरोधात काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:02 IST

केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरण व भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देधोरणांवर टीका : शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरण व भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी खा. मारोतराव कोवासे, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सदस्य पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युवका काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, एजाज शेख, हसन गिलानी, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, सी.बी. आवळे, प्रभाकर वासेकर, पी.टी. मसराम, महादेव भोयर, शंकर सालोटकर, नीलिमा राऊत, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, हरभाजी मोरे, विश्वजीत कोवासे, कमलेश खोब्रागडे, किशोर चापले, कल्पना नंदेश्वर, हेमंत भांडेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नगरसेवक सतिश विधाते, संचालन एजाज शेख यांनी केले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाजपाच्या धोरणांवर टीका केली. भारतीय जनता पार्टी मतांसाठी जनतेमध्ये मतभेद निर्माण करीत आहे. फोडा व राज्य करा हे इंग्रजांचे धोरण भाजपा शासनाने अवलंबिले आहे. त्यामुळे भाजप शासनाच्या कालावधीत सर्वाधिक मोर्चे, आंदोलन झाली आहेत. शासनाच्या धोरणाविरोधात जनता संतप्त आहे, अशी टीका केली.आरमोरीतही आंदोलनआरमोरी येथे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, पं.स. सभापती बबीता उसेंडी, कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत हरडे, कुरखेडाचे पं.स. सभापती गिरीधर तितराम, जि.प. सदस्य वनिता सहाकाटे, माजी जि.प. सभापती आनंदराव आकरे, पं.स. सदस्य वृंदा गजभिये, किरण म्हस्के, आरमोरी तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष मंगला कोवे, माजी पं.स. सभापती अशोक वाकडे, रामभाऊ हस्तक, नामदेव सोरते, मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, आर. पी. लहरी, डॉली नंदेश्वर, चंदू वडपल्लीवार, यज्ञकला ठवरे, कुरंडी मालचे सरपंच टिकेश कुमरे बेबी सोरते, नरेंद्र टेंभुर्णे, नरेंद्र गजभिये, बेबी सोरते यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.