शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध समाजबांधवांनी एकसंघ राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:11 IST

बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन : अहेरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.येथील इंदिरा नगर परिसरातील नियोजित धम्म दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश बद्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून गौतम मेश्राम, प्रा.नीरज खोब्रागडे, प्रा.विजय खोंडे, प्रा.डॉ.जगदीश राठोड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित व्हावा व संघर्ष करा, या मूलमंत्रानुसार बौद्ध समाजबांधवांनी आचरण ठेवायला हवे, आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, शुद्ध आचरण ठेवून आनंदीमय जीवन जगा, असे पालकमंत्री यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीच्या कल्याणासाठी अनेक योजनेचा लाभ घेऊन विकास करावा. अहेरीच्या इंदिरानगर येथील नियोजित जागेवर बुद्ध विहाराचे बांधकाम व इतर कामासाठी दोन कोटी रूपयांचा निधी देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी गौतम मेश्राम, जगदीश बद्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समाज मंडळाचे सहसचिव सुरेश अलोणे, संचालन आनंद अलोणे यांनी केले तर आभार किशोर शंभरकर यांनी मानले.