शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाच्या निमित्ताने एकवटल्या महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:59 IST

भामरागड इलाका परिसरातील ग्रामसभांच्या वतीने १२ मार्च रोजी धोडराज येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा घेण्यात आली. या संमेलनाच्या निमित्ताने शेकडो महिला एकत्र आल्या होत्या. या संमेलनात हुंडाबळी, व्यसन व महिला सशक्तीकरणावर मंथन करण्यात आले.

ठळक मुद्देधोडराज येथे जाहीर सभा : हुंडाबळी व महिला सशक्तीकरणावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड इलाका परिसरातील ग्रामसभांच्या वतीने १२ मार्च रोजी धोडराज येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा घेण्यात आली. या संमेलनाच्या निमित्ताने शेकडो महिला एकत्र आल्या होत्या. या संमेलनात हुंडाबळी, व्यसन व महिला सशक्तीकरणावर मंथन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भामरागड पंचायत समितीच्या सभापती प्रेमिला कुडयामी होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकबिरादरी प्रकल्प शाळेच्या संचालिका डॉ. अनघा आमटे, धोडराज पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरिक्षक आम्रपाली, बचत गटाचे दुधे, संजय साळवे, जयश्री लेकामी, जि.प. सदस्य ग्यानकुमारी कौशी, सुखराम मडावी, जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नोगोटी, सोमीबाई कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रेमिला कुड्यामी म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. महिलांना मिळवून दिलेला सन्मान व अधिकार याबाबत माहिती दिली. आदिवासी महिलांनी शिक्षणाच्या भरवशावर विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी डॉ. अनघा आमटे यांनी आदिवासी विवाह पध्दती चांगली असून आदिवासी समाजातील प्रत्येक विवाह सोहळा समाजाच्या सहकार्यातून पार पडत असतो. त्यामुळे इतर समाजानेही हुंडा पध्दती बंद केली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मुक्तीपथ तालुका प्रेरक चिन्नू महाका यांनी केले तर आभार रमेश पुंगाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी भामरागड पट्टी, पारंपारिक गोटूल समिती व पट्टीतील सर्व ग्रामसभा सदस्यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, यावेही ललिता मज्जी व ललिता कुसराम यांनी महिला अधिकार व हक्कांवर जनजागृतीपर गीत गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.