शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

जि.प.मध्ये ई-निविदा प्रक्रियेतही गोंधळ

By admin | Updated: January 4, 2015 23:11 IST

सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात १३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानातून प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

गडचिरोली : सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात १३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानातून प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या निविदा प्रक्रियेत शासन निर्णयाची पायमल्ली करून ती प्रक्रिया रेटून नेण्यात आली, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.ठराविक पुरवठादारांनाच निविदा भरत्या याव्या यासाठी खास मर्जी त्यांच्यावर दाखविण्यात आल्याचे या संपूर्ण प्रक्रियेत दिसून येत आहे. ३० आॅगस्ट २०१४ ची निविदा आयडी न टाकता ९ सप्टेंबर २०१४ ला वेबसाईटवर ती टाकण्यात आली. त्यात ई-निविदा अर्ज विक्री १० सप्टेंबर २०१४ च्या ४ वाजेपर्यंत व स्विकृती त्याच दिवशी ४ वाजेपर्यंत दर्शविण्यात आली. परंतु कार्यालयीन ई-निविदा अटी, शर्तीनुरूप सदर निविदा १५ सप्टेंबर रोजी स्विकृती तारीख दर्शविण्यात आली. अटीनुसार जिल्हा परिषदेत नेहमीच पुरवठा करणाऱ्या ९ निविदा धारकांच्या निविदा एकाच दिवशी ९ वेगवेगळ्या निनावी अर्जांवर रोख रक्कम घेऊन स्विकारण्यात देण्यात आल्या. ई-निविदेला मुदतवाढ १३ नोव्हेंबर २०१४ पर्यंत देताना निविदा अर्ज विक्री १५ नोव्हेंबर व स्विकृती १७ नोव्हेंबर दर्शविण्यात आले. त्यामुळे इतर पुरवठाधारकांना ई-अर्ज खरेदी करून सादर करता आले नाही. विशेष बाब म्हणजे २३ सप्टेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार ई-निविदा मुदतवाढ देताना अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती यामध्ये आठ दिवसांचे अंतर देणे बंधनकारक होते. परंतु असे न करता नेहमीच माल पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना निविदा भरता यावी यासाठी जि. प.प्रशासन प्रचंड मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे. ई-निविदा प्रक्रिया उघडण्यात आल्यावर अटी व शर्तीप्रमाणे एकाही निविदाधारकाकडे अधिकृत विक्रेत्याचे प्रमाणपत्र नाही. असे असतानाही जि.प. प्रशासनाने त्यांच्यावर खास मर्जी दाखविली आहे.