शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मारताच उखडले काँक्रिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:59 IST

आॅनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदर कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पसरविलेले सिमेंट काँक्रिट पाईपने पाणी मारताना उखडत आहे. रस्त्यावर गिट्टी निघत आहे. त्यामुळे या कामात बोल्डर, सिमेंट कमी व रेतीचे ...

ठळक मुद्देमग्रारोहयोतून काम : अरसोडाच्या सिमेंट रस्ता बांधकामाच्या चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदर कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पसरविलेले सिमेंट काँक्रिट पाईपने पाणी मारताना उखडत आहे. रस्त्यावर गिट्टी निघत आहे. त्यामुळे या कामात बोल्डर, सिमेंट कमी व रेतीचे प्रमाण अधिक असल्याचे बांधकामावरून दिसून येत आहे. या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.आमोरी पंचायत समितीमार्फत महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायतने २०१५-१६ या सत्रात कोणतेही अकुशल काम केले नाही. अशाच ग्रा.पं.च्या गावात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे नियमबाह्य बांधकाम करण्यास मूक संमती दिली. अरसोडा येथील दुर्गा मंदिर ते दिगांबर ढोरे यांच्या घरापर्यंत १५० मीटर लांब व ४ मीटर रूंदीचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम होत आहे.या कामात ८० एमएम गिट्टी कमी, रेती अधिक तसेच सिमेंट कमी वापरले जात असल्याने पाईपने रस्त्यावर पाणी मारताना संपूर्ण बेड काँक्रिट उखडत आहे. रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी बाहेर पडत आहे. त्यामुळे चार-सहा महिन्यांत रस्त्याला भेगा पडून खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळपास १५ ते २० लाख रूपये खर्च करून रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. परंतु या कामावर संबंधित अभियंता किंवा कंत्राटदार कधीच राहत नाही. काँक्रिट रोड तयार करताना बांधकाम साहित्य व बांधकामाचा दर्जा योग्य प्रकारे व्हावा, याकरिता संबंधित लोकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. परंतु जबाबदार अधिकाºयांच्या देखभालीअभावी येथील काम दुसºयाच्या भरवशावर सुरू आहे. केवळ टेबलावरून कामाची अंमलबजावणी करण्यावर अधिकाºयांचा भर असल्याचे दिसून येते.येथील रस्त्याचा दर्जा घसरू नये म्हणून रोहयो विभागातील जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी कामाची चौकशी करावी. नियमबाह्य काम करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.अरसोडा गावातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम दर्जेदार आहे. २० एमएम च्या काँक्रिटला योग्य व मजबूत पकड मिळावी म्हणून जाणीवपूर्वक बेड काँक्रिटचे काम त्या पद्धतीने केलेले आहे.- खेमराज पत्रे,सरपंच, ग्रामपंचायत अरसोडा