शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

५०% सवलतीच्या बियाण्यांवर संक्रांत

By admin | Updated: June 28, 2015 02:16 IST

जिल्हा परिषदेच्या १३ वने, सात टक्के वन महसूल अनुदान योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीवर...

साडेतीन हजारांची मागणी : १ हजार २९२ क्विंटल प्राप्तगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या १३ वने, सात टक्के वन महसूल अनुदान योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीवर ३ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याची बाराही पंचायत समिती स्तरावरून मागणी होती. मात्र जि.प. कृषी विभागाकडे अत्यल्प निधी असल्याच्या कारणावरून कृषी विभागाने केवळ १ हजार २९२ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. सवलतीवर अत्यल्प प्रमाणात बियाणे उपलब्ध झाल्याने अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना पूर्ण पैसे भरून महागडे बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करावे लागणार आहे. १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदान योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ या वर्षीच्या अंदाजपत्रकात बियाणे खरेदीसाठी २० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यात १५ लाख रूपयांतून खरीप हंगामातील बियाणे तर पाच लाख रूपयांतून रबी हंगामातील बियाणे सवलतीत पुरविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले. यानुसार जि.प.ने १५ लाख रूपयांतून खरीप हंगामासाठी धान, तूर व सोयाबिन आदी पिकांचे एकूण १ हजार २९२ क्विंटल बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. जि.प.च्या कृषी विभागाने ५० टक्के सवलतीवर धान पिकाची एकूण ७९८ बियाणे उपलब्ध केले आहे. यामध्ये गडचिरोली पंचायत समितीला ८१ क्विंटल, आरमोरी ८९, देसाईगंज ४३, कुरखेडा ७१, कोरची ५७, धानोरा ८६, चामोर्शी १३०, मुलचेरा ३५, अहेरी ५४, एटापल्ली ७२, भामरागड ४२ व सिरोंचा पंचायत समितीला ३८ क्विंटल धान बियाणे उपलब्ध करून दिले आहे. सदर बियाणे खरेदीसाठी जिल्हा परिषदेने १४ लाख ९९ हजार ५०० रूपयांचा निधी खर्च केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)शेतकऱ्यांना असे मिळणार अनुदानजि.प.च्या १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदान योजनेतून ५० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्रीराम जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल २ हजार ५०० रूपये, एमटीयू १०१० जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल १ हजार ५०० रूपये, एमटीयू १००१ जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल १ हजार ५००, आयआर ६४, जेजीएल १७९८, पीकेव्ही एचएमटी, सुवर्णा जातीच्या धान बियाण्यांवर प्रती क्विंटल १ हजार ५०० रूपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. डीआरके जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल २ हजार ५०० रूपय व सह्यांद्री धान बियाण्यावर प्रती क्विंटल पाच हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. तूर बियाण्यावर प्रती क्विंटल ३ हजार ५०० व सोयाबिन बियाण्यांवर प्रती क्विंटल २ हजार ५०० रूपये शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.