शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद

By admin | Updated: June 15, 2014 23:32 IST

राज्य शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यांतर्गतचा निधी संबंधित उपयोजनेवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

गडचिरोली : राज्य शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यांतर्गतचा निधी संबंधित उपयोजनेवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सदर निधी जुलै २०१४ पर्यंत खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासींच्या विकासासाठी शेकडो योजना असून दरवर्षी या योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. आदिवासींच्या विकासासाठी आदिवसाी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्र असे दोन प्रकार पडतात. राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विहीर बांधून दिल्यास सिंचनाची सुविधा होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन सिंचन विहिरींची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत १ कोटी १४ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. कुपनलिकांचे बांधकाम करण्यासाठी मात्र एकही निधी देण्यात आला नाही. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ९० पेक्षा जास्त आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा मात्र अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्वश्रूत आहे. आश्रमशाळांना पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे १ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शौचालय बांधकामासाठी सुमारे ५७ लाख ५० हजार रूपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर निधी आदिवासी उपयोजनांवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. चार महिन्यामध्ये सदर निधी खर्च करावा लागणार असल्याने ५० टक्क्यापेक्षा जास्त काम झाले असलेल्या कामावरच सदर निधी खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)