शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

आरमोरीत कुटुंबकल्याण उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: April 5, 2015 01:53 IST

जिल्हाभरात मागील वर्षात मातामृत्यूच्या २२ घटना घडल्या. मात्र आरमोरी तालुक्यात एकाही मातेचा मृत्यू प्रसूतीदरम्यान झाला नाही.

वैरागड : जिल्हाभरात मागील वर्षात मातामृत्यूच्या २२ घटना घडल्या. मात्र आरमोरी तालुक्यात एकाही मातेचा मृत्यू प्रसूतीदरम्यान झाला नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत तालुक्याने राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात १०० टक्के उद्दिष्टप्राप्त केले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांनी दिली आहे. मानव विकास मिशन अंतर्गत वडधा येथे सात, वैरागड येथे तीन, भाकरोंडी येथे तीन, देलनवाडी येथे तीन अशा एकूण १५ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. महिला आरोग्य अभियानांतर्गत तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुकास्तरावर मेळावे आयोजित करून रक्त, शर्करा तपासणी, गरोदर माता नोंदणी, रक्तदाब तपासणी, सिकलसेल, पोषण आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिरात मातांना बाळाजी काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १० दिवसीय कार्यक्रम राबवून प्रत्येक गावात आरोग्य सेवकांद्वारे गृहभेटीचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत ५४ आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यात आला. जननी शिशू कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गरोदर मातेला रुग्णालयात भरती करण्यासाठी शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात आले. प्रसूती पश्चात आदिवासी मातांना ४०० रूपये दिल्या जात आहे. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे आरमोरी तालुक्यात मागील वर्षी एकाही मातेचा प्रसूतीदरम्यान व काळात मृत्यू झाला नाही, अशी माहिती डॉ. मोटे यांनी दिली.