शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

जुलै अखेर पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:52 IST

शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध झाल्यास मशागतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलै अखेर गाठावे, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना । पीककर्जाच्या अडचणी अग्रणी बँकेकडे मांडा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध झाल्यास मशागतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलै अखेर गाठावे, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना दिले आहेत.शेतकºयांसाठी मिळणाºया पीक कर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा कक्षाला प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांच्या पीक कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना विविध सूचना केल्या आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. अन्यथा पीक लागवडीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागते. परिणामी पैशाअभावी काही शेतकरी आपली जमीन पडिक ठेवतात. अशी परिस्थिती कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये, याकरिता सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांनी पीक कर्ज वितरणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले.कोणत्याही शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना काही अडचणी निर्माण होत असल्यास त्यांनी थेट गडचिरोली येथील अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे अडचणी मांडून दाद मागावी, असे आवाहन त्यांनी केले. सदर बँकेचे व्यवस्थापकाने तातडीने कार्यवाही करून संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यावेळी अधिकारी उपस्थित होते.स्व:घोषणापत्र अनिवार्यपीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत सर्वात मोठी अडचण ही कागदपत्र पूर्ततेची आहे. कोणत्याही शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी इतर बँकांचे बेबाकी किंवा नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावयाचे नाही. तसेच आॅनलाईन सातबारा काढल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या सहीशिक्क्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी म्हटले आहे. पीक कर्जासाठी सातबाऱ्यावर बोजा चढविण्याची आवश्यकता नाही. मात्र शेतकºयाने स्व:घोषणापत्र सादर करणे अनिवार्य आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज