रापेल्लीवारांची पत्रपरिषद : शिवीगाळ केली नाहीभामरागड : नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही, आपल्याला फसविण्यासाठीच संबंधितांनी पोलिसात तक्रार दाखल केली, असा आरोप भामरागड नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हरिदास रापेल्लीवार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.२३ एप्रिल २०१५ ते १ जानेवारी २०१६ या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचा हिशोब मागितला असता, हिशोब देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करीत आपल्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, असेही हरिदास रापेल्लीवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी हिरामण परसे यांची विचारणा केली असता, घटनाप्रसंगी मी कार्यालयात हजर नव्हतो, मात्र न. पं. कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराची आपणास भ्रमणध्वनीवर माहिती दिली. सदर प्रकार पुढे घडू नये, याकरिता आपण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे सांगितले. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष राजू वड्डे, पाणीपुरवठा सभापती शंकर आत्राम, नगरसेविका वसंती मडावी, नगरसेवक जयराम मडावी, रामजी पुुंगाटी, चिन्ना महाका उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
प्रकरणात गोवण्यासाठीच पोलिसात तक्रार
By admin | Updated: April 11, 2016 01:44 IST