शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवरील आक्षेपार्ह मजकुराबाबत तक्रार

By admin | Updated: July 14, 2017 02:13 IST

येथील किशोर कार्तिक डे यांनी नगरसेवकांबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हॉटस्अ‍ॅप गु्रपवर टाकल्याने एटापल्ली नगर

एटापल्लीतील प्रकार : नगरसेवकांबाबत विधानलोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथील किशोर कार्तिक डे यांनी नगरसेवकांबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हॉटस्अ‍ॅप गु्रपवर टाकल्याने एटापल्ली नगर पंचायतीच्या नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.नगर पंचायत ग्रुप तसेच आपली तालुका शाखा भाजप या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर किशोर डे याने नगरसेवकांना ‘लाचखोर’ असे संबोधले आहे. त्याचबरोबर अपमानीत करणारे इतरही शब्द टाकले आहेत. ही बाब एटापल्ली नगर पंचायतीच्या नगरसेवकांना माहित झाली. त्यानंतर त्यांनी या मजकुराबाबत नगरसेवकाने आक्षेप घेत याबाबतची तक्रार एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवर एटापल्ली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, गटनेते दीपक सोनटक्के, उपाध्यक्ष रमेश गंपावार, नगरसेवक ज्ञानेश्वर रामटेके, सगुणा हिचामी, तानाजी दुर्वा, योगेश्वर नल्लावार, नामदेव दुर्गे, सुनिता चांदेकर, किरण लेकामी यांच्या सह्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, अहेरी येथे सुध्दा बुधवारी माजी ठाणेदार संजय मोरे यांच्या विरोधात अहेरी येथील काही नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे.