शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

दीक्षाभूमी विकासासाठी कटिबद्ध

By admin | Updated: November 14, 2016 02:05 IST

देसाईगंज येथील दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण

सामाजिक न्यायमंत्र्यांची ग्वाही : देसाईगंज येथे जनसंवाद मेळावा; भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थितीदेसाईगंज : देसाईगंज येथील दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार कटिबद्ध असून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. देसाईगंज येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा. अनिल सोले, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रकाश पोरेड्डीवार, न.पं. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पंचायत समिती सभापती प्रिती शंभरकर, न.प. सभापती शालू दंडवते, तालुका अध्यक्ष राजेश जेठाणी, आकाश अग्रवाल, चांगदेव फाये, रवी गोटेफोडे, आशा राऊत, बबलू हुसैनी, संतोष शामदासानी, सतपाल नागदेवे, नरेश विठ्ठलानी, ज्योतू तेलतुंबडे, सचिन खरकाटे, अण्णाजी तुपट, नंदू नाकतोडे, पंकज खरवडे, करूणा गणवीर, तेजराम हरडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना ना. राजकुमार बडोले म्हणाले की, इंदूमिलच्या साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण, परदेशात राहून ज्या घरात शिक्षण घेतले, त्या लडंन येथील घराचे लिलाव होऊ न देता भाजपप्रणित सरकारने पुढाकार घेऊन विकत घेतले. अनुसूचित जाती व जमातींच्या विकासाचे आपण राजकारण करणार नाही. तर त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभे राहू, असे मार्गदर्शन केले. देसाईगंज येथील दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे हे श्रध्दास्थान आहे. यापूर्वीच्या सरकारचे या पावनभूमीकडे दुर्लक्ष झाले. मात्र भाजपा सरकार या स्थळाचा विकास करेल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.मागील निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या करूणा संजय गणवीर या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत व्यासपीठावर होत्या. त्यामुळे त्या भाजपवासी होऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)