शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध

By admin | Updated: August 10, 2015 00:52 IST

महाराष्ट्र राज्यात जवळपास ९५ लाख आदिवासी आहेत. आदिवासी बांधव अद्यापही दऱ्याखोऱ्यात जंगलात वास्तव्य करीत आहेत.

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम : अशोक नेते यांचे प्रतिपादनगडचिरोली : महाराष्ट्र राज्यात जवळपास ९५ लाख आदिवासी आहेत. आदिवासी बांधव अद्यापही दऱ्याखोऱ्यात जंगलात वास्तव्य करीत आहेत. परिणामी ते विकासापासून कोसोदूर आहेत. आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी आपण प्राधान्याने शासनस्तरावर पाठपुरावा करणार, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा गडचिरोली व विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील गोंडवाना कलादालनात जागतिक आदिवासी दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष भरत येरमे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू राजगडकर, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, जि.प. सदस्य केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, डॉ. हेमंत मसराम, हलबा हलबी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शालिक मानकर, चामोर्शीचे संवर्ग विकास आधिकारी बादलशहा मडावी, जिल्हा सेवा योजन अधिकारी भैय्याजी येरमे, डॉ. प्रविण किलनाके आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य देऊ तसेच गडचिरोली येथील आदिवासी समाज बांधवांच्या गोटूल भवनासाठी खासदार निधीतून २० लाख रूपये देण्याचे खासदार अशोक नेते यांनी यावेळी मान्य केले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, आदिवासी बांधवांनीच खऱ्या अर्थाने वसुंधरेच्या संवर्धनाचे प्रामाणिक काम केले आहे. आदिवासींची भाषा, संस्कृती टिकली पाहिजे. सध्या आदिवासींच्या आरक्षणातून धनगरासारख्या जमातींना आरक्षण देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण होईल. आदिवासींनी आपले आरक्षण व संरक्षण टिकवून ठेवण्यासाठी संघटितपणे आंदोलनाची तयारी ठेवावी, असे उसेंडी यावेळी म्हणाले. यांप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सदानंद ताराम यांनी केले तर संचालन वनिशाम येरमे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)