शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी आयोग कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:48 IST

राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोग कटिबध्द असून संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल. अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले.

ठळक मुद्देहाजी अराफत शेख यांचे प्रतिपादन : शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोग कटिबध्द असून संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल. अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी बाबतचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जुनेद खान, राजा अदाटे, दिपक कैतके उपस्थित होते.पुढे बोलताना शेख म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजासाठी शासन विविध योजना राबवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळतो की नाही, त्यात काही अडचणी आहेत काय, या बाबत जाणुन घेण्यासाठी आतापर्यंत १९ जिल्ह्यांना भेट देत असून त्यांचा साप्ताहिक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे. तसेच जिल्ह्यातील मुस्लीम समाजाच्या दफन भुमिच्या विकासासाठी निधी प्राप्त करुन देण्यात येईल. त्याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.गडचिरोली येथे आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पारशी, जैन, बौध्द, मुस्लिम बांधवासमवेत बैठक घेऊन साधक बाधक चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी शेख यांनी दिले.अल्पसंख्याकांच्या योजना राबवित असलेल्या विविध विभागाच्या कार्यालय प्रमुखांकडून माहिती अवगत केली. सर्व योजना, लाभाचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता ते पूर्ण करुन शासनाकडे पाठवाव्यात व तसे आयोगाला कळवावे, जेणे करुन शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास सुलभता येईल, असे सांगितले.यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी