शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:22 IST

खासगी गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. आकर्षक विद्युत रोषणाई व विविध सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने युवा मंडळींसाठी गणेशोत्सव ही एक पर्वणीच ठरते. सोमवारी पहाटेला पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देदिवसभर होती लगबग : सायंकाळी गुंजू लागले गणरायाच्या आरतीचे मंगल स्वर

लोकमत न्यूज नेटवर्कघरातील आबालवृध्दांना आगमनाची प्रतीक्षा लागून असलेल्या गणरायाचे २ सप्टेंबर रोजी आगमन झाले. गणरायाची सजावट, पूजा व प्रतिष्ठापणेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची जुळवाजुळव करण्यात प्रत्येक भाविक व्यस्त असल्याचे दिसून येत होते. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रतिष्ठापणेचा मुहूर्त असल्याने अनेकांनी सायंकाळच्या सुमारास गणरायाची प्रतिष्ठापणा केली.खासगी गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. आकर्षक विद्युत रोषणाई व विविध सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने युवा मंडळींसाठी गणेशोत्सव ही एक पर्वणीच ठरते. सोमवारी पहाटेला पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसा विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांची गैरसोय टळली. ग्रामीण भागात रोवण्यांची कामे आटोपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कामापासून उसंत मिळाली असल्याने ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण आहे. दरदिवशी पाऊस येत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांची दमछाक होणार आहे. प्रत्येक मंडळाला वॉटरप्रुफ मंडप टाकावा लागला आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.गडचिरोलीतील मानाचा गणपती विराजमानगडचिरोली शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्या घरी मांडला जात असलेल्या गणपतीला गडचिरोली शहराचा मानाचा गणपती म्हणून ओळख आहे. सोमवारी भजनाच्या गजरात मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. अनंत चतुर्थीच्या दिवशी पोरेड्डीवार यांच्या मार्फत विविध पारंपारिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे पाहण्यासाठी ग्रामीण भागातून हजारोंची गर्दी गडचिरोलीत उसळते.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019