शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सत्ता परिवर्तनाने हातातील झेंड्याचा रंगही बदलला

By admin | Updated: May 20, 2014 23:38 IST

सत्ता परिवर्तन होताच सत्ताधार्‍यांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे़ ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाविरोधी काम केले, त्या व्यक्तीचे नाव

देसाईगंज : सत्ता परिवर्तन होताच सत्ताधार्‍यांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे़ ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाविरोधी काम केले, त्या व्यक्तीचे नाव निवडून आलेल्या उमेदवाराच्या बॅनरवर दिसू लागले आहे़ यावरून ‘निवडून आले ते आपले’ या उक्तीचा प्रत्यय येत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाने एकतर्फी विजय मिळविला आहे़ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्या कार्यकत्यांनी दुसर्‍या पक्षाकरिता दिवसरात्र एक करून काम केले ते कार्यकर्ते मतमोजणी होताच विजयी उमेदवाराच्या गोट्यात येऊन बसले आहेत़ आम्ही आपल्याच पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत़ हे दाखविण्यासाठी त्यांनी रस्त्यावर मोठमोठे बॅनर लावले आहेत़ उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची भारतीय संस्कृतीच आहे़ प्रवाहासोबत जाणे हितावह आहे़ सत्ता आणि पैसा हे समीकरण झाले आहे़ म्हणूनच ज्या कार्यकत्यांनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवाराला पाठ दाखविली होती़ तो उमेदवार विजयी होताच त्याच्यासमोर एकनिष्ठतेचे कवित्व गाऊ लागले आहेत. काही कार्यकत्यांकरिता निवडणूक म्हणजे पैसा कमाविण्याचा मार्ग झाला आहे़ या कार्यकत्यांनी विजयी उमेदवाराच्या गटात स्वत:ला सामावून घेतले आहे़ खुद्द भाजपाच्या एका गटाने भाजपाच्या विरोधात काम केले होते़ मात्र निवडणुकीचा निकाल लागताच त्यांनी विजयी उमेदवाराची कास पकडली आहे़ काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी देखील भाजपाला जवळ केले आहे़ लोकसभेच्या निकालापूर्वी विरोधी पक्षाचा तिरस्कार करणार्‍यांनी निकालानंतर सत्ताधार्‍यांना बॅनरच्या सहाय्याने आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे़ सत्तेत आले ते आपले याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्टÑात येत आहे. कोण आपला व कोण विरोधातला हे समजणे विजयी उमेदवाराला कठीण झाले आहे. निकालानंतर हातातील झेंड्याचा रंग बदलेला असल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)