शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर कोतवालांची धडक

By admin | Updated: February 10, 2016 01:47 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी जिल्हाभरातील कोतवालांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

मागण्यांचे निवेदन सादर : चतुर्थ श्रेणी लागू करण्याची मागणीगडचिरोली : कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी जिल्हाभरातील कोतवालांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तहसील कार्यालयात काम करणाऱ्या कोतवालांना साजावर पाठविण्यात यावे, तलाठी संवर्गातील २५ टक्के पदे कोतवालांमधून भरण्यात यावी, चतुर्थी श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवाल भरतीमध्ये वारसान हक्काप्रमाणे २५ टक्के आरक्षण देण्यात यावे, शिपाई संवर्गात पदोन्नती द्यावी, रिक्त पदे तत्काळ भरावी, मानधनातून कपात केलेला व्यवसाय कर परत करावा, अग्रीम कमीतकमी ३ हजार रूपये द्यावा, कोतवालांना मासिक पेंशन द्यावी, निलंबित केलेल्यांना सेवेत घ्यावे, आॅनलाईन सातबारा दुरूस्ती व फेराफेर करण्याकरिता कोतवालांकडील काम बंद करावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास २०० ते २५० कोतवाल सहभागी झाले होते. स्थानिक इंदिरा गांधी चौकातून दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रवींद्र बोदेले, उपाध्यक्ष यू. के. खेवले, सचिव व्ही. एन. दहागावकर, सहसचिव व्ही. सी. खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष योगेश कुमरे, उपकोषाध्यक्ष आर. एम. पेंदाम, बंडू कांबळे, एच. पी. निमजे, दीपक लिंगायत, विलास चांदेकर, एस. डी. मडावी, एम. डी. साखरे, पी. डी. दर्रो, युवराज ढवळे, आर. एस. करमे, किशोर मडावी, काटंगे, मेश्राम यांनी केले. राज्यभरात १२ हजार ६३७ इतके कोतवाल कार्यरत आहेत. त्यांना दरमहा ५ हजार १० रूपये मानधन मिळत आहे. कोतवाल हे पूर्णवेळ काम करीत असल्याने त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबत मागील ५० वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र अजूनपर्यंत हा दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)