जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : भामरागड तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना दाव्यांचे वितरणभामरागड : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तालुक्यातील ३७ गावातील सामूहिक वनहक्क दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर गुरूवारी येथील तहसील कार्यालयात वाटप करण्यात आले. ३७ गावातील लाभार्थ्यांना सामूहिक पट्ट्यांचा लाभ देण्यात आला.सामूहिक दावे केलेल्या वनहक्क समितीचे अध्यक्ष यांना तहसील कार्यालयात तहसीलदार अरूण येरचे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार स्वामी डोंगरे यांच्या हस्ते ३७ गावांना सामूहिक वनहक्क दाव्यांचे पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार परसे, एकनाथ म्हशाखेत्री, भगत, अनुप घाटे उपस्थित होते. वनहक्क दावे सादर केल्यानंतर वनहक्क पट्टे मिळविण्यासाठी गावांनी दीर्घकाळ संघर्ष करून प्रशासनाशी वाटाघाटी केल्या. (तालुका प्रतिनिधी)वनहक्क लाभार्थी गावेवनहक्क पट्टे वाटप करण्यात आलेल्या गावांमध्ये कृष्णार, कियर, बंगाळी, हालदंडी, नेलगुंडा, मिडदपल्ली, इतलवारा, कवंडे, पोयरकोठी, गुंडापुरी, गोगेवाडा, परयनार, बोळंगे, घोटपाडी, कुचेर, गोंगवाडा (म.), लष्कर, होड्री, गोपनार, दर्भा, गोलागुडा, मलमपोडूर, मुरंगल, हिंदेवाडा, भुसेवाडा, कुमरगुडा, भामरागड, दुब्बागुडा, जिंजगाव, कसनसुर, झारेगुडा, बोरिया, पल्ली, भामनपल्ली, जोणावाही, इरकडुम्मे गावांचा समावेश आहे.
३७ गावांना सामूहिक वनहक्क वाटप
By admin | Updated: November 7, 2015 01:22 IST