शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनीक्षेपकाद्वारे कोंबड बाजाराची जाहिरात

By admin | Updated: August 4, 2016 01:50 IST

गृहखात्याच्या लेखी कोंबडबाजार भरविणे व त्यात कोंबडीच्या झुंजी लढविणे कायदेशीररित्या कारवाईस पात्र आहे.

मानापूर येथे प्रकार : सलंगटोला, येंगाडावासीयांनी केला प्रचार मानापूर/देलनवाडी : गृहखात्याच्या लेखी कोंबडबाजार भरविणे व त्यात कोंबडीच्या झुंजी लढविणे कायदेशीररित्या कारवाईस पात्र आहे. असे असताना आरमोरी तालुक्याच्या सलंगटोला गावात भरणाऱ्या कोंबड बाजाराची लाऊडस्पीकरवरून पंचक्रोशीत माहिती देत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणेचे अशा प्रकाराकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. झाडीपट्टी, नाटक, गोंधळ, तमाशा आदींचे आयोजन केले जाते. याची जाहिरातही लाऊडस्पीकरवरून केली जाते. मात्र आरमोरी तालुक्यातील सलंगटोला-येंगाडा गावच्या नागरिकांनी चक्क कोंबड बाजार भरणार असल्याचे लाऊडस्पीकरवरून जाहीर करीत कोसरी, मांगदा, अंगारा, देलनवाडी, नागरवाही, पिसेवडधा, जांभळी, भाकरोंडी येथे प्रचार केला व या कोंबड बाजाराला उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बहुतांश कोंबड बाजारात कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जातात. अनेक कोंबड बाजारावर यापूर्वी कारवाईसुध्दा केली आहे. कोंबडबाजारात दारू, सट्टा यासह अवैध धंद्यांचा समावेश असतो. तरीसुध्दा कोंबड बाजार भरविण्याचा प्रचार सलंगटोलावासीयानी केला. कोंबड बाजाराला कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आमचा गाव, आमचा विकास या नाविन्यपूर्ण योजनेतून गाव विकास आराखडा तयार करून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवकांसाठी रोजगाराची संधी प्राप्त व्हावी, असे प्रयत्न सुरू आहे. गावाचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास व्हावा, हा हेतू असतानाही सलंगटोलावासीयांच्या वतीने कोंबड बाजार भरविण्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला जात आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कोंबड बाजारावर बंदी घालावी, अशी मागणी मानापूर येथील नामदेव मोरघडे, तंमुस अध्यक्ष पांडुरंग गुरनुले, प्राचार्य डी. के. मेश्राम, डी. डी. मैंद, रामहरी चौधरी, सरपंच धनिराम कुमरे, मांगदा येथील बी. आर. पदा, भाजप तालुका उपाध्यक्ष रामहरी चौधरी, भास्करराव उंदीरवाडे, रामभाऊ हस्तक, वैरकर आदींनी केली आहे. (वार्ताहर)