शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

किनाऱ्याचा मंदिराला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:32 IST

मार्कंडादेव देवस्थानातील मंदिरे अत्यंत पुरातन असल्याने या स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांसोबतच पर्यटकही येतात. मार्कंडादेव येथील मंदिरे वैनगंगा नदीच्या अगदी किनाऱ्यांवर आहेत.

ठळक मुद्देनिधी मंजूर : मार्र्कं डादेव येथील पायऱ्यांचे बांधकाम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मार्कंडादेव देवस्थानातील मंदिरे अत्यंत पुरातन असल्याने या स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांसोबतच पर्यटकही येतात. मार्कंडादेव येथील मंदिरे वैनगंगा नदीच्या अगदी किनाऱ्यांवर आहेत. दिवसेंदिवस नदी किनारा कोसळत चालला आहे. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. नदी किनाऱ्यावर पायऱ्यांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी मार्कंडादेवच्या सरपंच उज्ज्वला गायकवाड व पोलीस पाटील आरती आभारे यांनी केली आहे.प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मार्कंडादेवच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये टॅक्सी पार्किंगच्या बांधकामासाठी ३२ लाख रूपये, पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी ९.९५ लाख रूपये, निरीक्षण मनोेरा बांधकामासाठी ३१ लाख ५४ हजार, नदी किनारा विकासासाठी ९९ लाख ५१ हजार, सुलभ शौचालय बांधण्यासाठी १९ लाख ९० हजार, बंद गटार बांधकामासाठी ७ लाख १० हजार रूपये मंजूर केले आहेत. या कामांचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमीपूजनही करण्यात आले. यापैैकी सुलभ शौचालयाचे काम पूर्ण झाले. परंतु हस्तांतरित झाले नाही. पार्र्किंग सुविधेचे काम सुरू झाले आहे. इतर कामे मात्र सुरू झाली नाही. यामध्ये महत्त्वपूर्ण काम म्हणजे किनाºयावर पायºया बांधण्याचे आहे. पायºयांचे बांधकाम झाल्यास किनारा खचण्यापासून वाचविता येईल.मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आलेले बहुतांश भाविक नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जातात. पायºया नसल्याने नदीत उतरताना व चढताना भाविकांना त्रास होतो. पायऱ्यांचे बांधकाम झाल्यास भाविकांसाठी सोयीचे होणार आहे. विशेष करून महाशिवरात्रीला भरणाऱ्या जत्रेदरम्यान हजारो भाविक मार्र्कंडादेव येथे येतात. नदीपात्रात जाण्यासाठी मोठी गर्दी निर्माण होते. पायऱ्यांचे बांधकाम झाल्यास भाविकांसाठी सुद्धा सोयीचे होणार असल्याने जत्रेपूर्वी बांधकाम करण्याची मागणी आहे.इतर कामेही रखडलीराज्य शासनाने मार्कंडादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र निरीक्षण मनोरा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टॅॅक्सी पार्र्किंग सुविधा आदी कामांना अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. याकडे शासनाने लक्ष घालून बांधकामाला सुुरुवात करावी, अशी मागणी सरपंच उज्ज्वला गायकवाड व पोलीस पाटील आरती आभारे यांनी केली आहे.