शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हक्कासाठी कुणबी समाजबांधव एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:24 IST

कुणबी जातीवर नॉन क्रिमीलेअरची असंवैधानिक अट लादल्यामुळे या समाज बांधवांवर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात गडचिरोली शहरासह परिसरातील कुणबी समाज बांधव एकवटले असून....

ठळक मुद्देक्रिमीलेयरमधून वगळा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुणबी जातीवर नॉन क्रिमीलेअरची असंवैधानिक अट लादल्यामुळे या समाज बांधवांवर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात गडचिरोली शहरासह परिसरातील कुणबी समाज बांधव एकवटले असून त्यांनी शुक्रवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन कुणबी जातीला नॉन क्रिमीलेअरच्या अटीतून वगळण्यात यावे, अशी एकमुखी मागणी केली.गडचिरोली शहरातील व तालुक्यातील कुणबी समाज बांधव दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरातील शासकीय विश्रामगृहात मोठ्या संख्येने एकत्र आले. येथून कुणबी समाज बांधवांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.याप्रसंगी महेंद्र ब्राह्मणवाडे, रत्नदीप म्हशाखेत्री, प्रशांत वाघरे, नगरसेवक सतीश विधाते, न.पं. सभापती केशव निंबोड, पांडुरंग घोटेकर, प्रा. अनिल धामोडे, प्रल्हाद म्हशाखेत्री, पुंडलिक पुडके, रूचित वांढरे, संतोष मुनघाटे, वासुदेव बट्टे, दयाकर चौधरी, विलास खेवले, विलास चुधरी, नंदू वाईलकर, तुळशीदास भोयर, राजेश गोहणे, संदीप ठाकरे, सचिन गोंगल, विठ्ठल नवघडे, विवेक ब्राह्मणवाडे, नागेश आभारे, सचिन बोबाटे, प्रविण वाघरे, पंकज नरूले, भगवान घोटेकर, जीवन नवघडे, अजय म्हशाखेत्री, निलकंठ निखाडे, रूपेश ठाकरे, उत्तमराव म्हशाखेत्री, थामस म्हशाखेत्री यांच्यासह शेकडो कुणबी समाज बांधव उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुणबी समाज हा राज्यात पूर्वीपासून शेतीशी निघडीत समाज असल्याने तो आर्थिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णत: मागासलेला आहे. शेती आणि शेत मजुरी हाच पूर्वापार चालत आलेला कुणबी समाजाचा व्यवसाय आहे. राज्यातील कुणबी समाज संपन्न किंवा वैभवशाली नसल्याने या समाजास क्रिमिलेअरच्या अटीतून शिथिलता द्यावी, ओबीसी समूहासाठी ठेवण्यात आलेली क्रिमिलेअरची अट असंवैधानिक असल्याने ती अट रद्द करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.कुणबी समाजावर सातत्त्याने अन्याय होत असल्याने या समाजातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मागासलेल्या कुणबी समाजाला न्याय द्यावा, असे म्हटले आहे.तर ओबीसी समाज मोठे आंदोलन उभारणार - अरूण मुनघाटेराज्य मागासवर्ग आयोगाने केलेली शिफारास अमान्य करून महाराष्टÑ शासनाने ओबीसी संवर्गातील सर्व जातींना क्रिमीलेअरच्या अटीतून वगळण्याची कारवाई करावी व ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अन्यथा ओबीसी संघर्ष कृती समिती व जिल्ह्यातील इतर ओबीसी संघटना एकत्र येऊन या अन्यायाच्या विरोधात मोठे आंदोलन उभारणार, असा इशारा ओबीसी संघर्ष कृती समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अरूण मुनघाटे यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या सहसचिवांना २६ आॅक्टोबर रोजी निवेदन पाठविले आहे. काही विशिष्ट जातींना क्रिमीलेअरच्या अटीतून वगळण्याची केलेली शिफारस ही निंदनिय व खेदजनक आहे, असे त्यांनी म्हटले.