शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

Lok Sabha Election 2019; अडपल्ली व विसापूर केंद्रावर उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:34 IST

प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या १० क्रमांकाच्या केंद्रावर प्रात्यक्षिकाचे मत गृहित धरल्याने एकूण मतदानाच्या आकड्यात फरक आढळून आला.

ठळक मुद्देअनेक केंद्रांवर दुपारी ४ वाजतानंतरही झाले मतदान : वेळखाऊ प्रक्रियेने मतदानाशिवाय अनेक मतदार घरी परतले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या १० क्रमांकाच्या केंद्रावर प्रात्यक्षिकाचे मत गृहित धरल्याने एकूण मतदानाच्या आकड्यात फरक आढळून आला. त्यामुळे या बुथावरील पक्षांच्या प्रतिनिधींसह मतदारांमध्ये काही वेळ गोंंधळ निर्माण झाला. तसेच गडचिरोली शहरातील विसापूर येथील वीर बाबुराव शेडमाके नगर परिषद शाळेच्या केंद्र क्रमांक ११८ मध्ये ईव्हीएम गतीने काम करीत नसल्याने ४० वर मतदार मतदान न करता घरी परत गेल्याची माहिती आहे.अडपल्लीच्या केंद्र सकाळी ७.०० वाजता मतदानाची प्रकिया सुरू करण्यात आली. ८.३० वाजतापर्यंत १८ ते १९ मतदारांनी मतदान केले. मात्र यावेळी तपासणी केली असता, मतदानाचा एकूण आकडा ७१ दाखविल्या जात होता. काही लोकांनी ओरड केल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रात्यक्षिकाचे ५० मते त्यात मिसळल्याचे झोनल अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर जवळपास १ तास या केंद्रावर मतदानाची प्रक्रिया बंद पडली. त्यानंतर काही वेळाने मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली. दरम्यान मतदारांची लांबच्या लांब रांग लागली होती.विसापूर येथील वीर बाबुराव शेडमाके न. प. शाळेच्या केंद्रावर ईव्हीएमची गती कमी असल्याने मतदारांची रांग कमी होत नव्हती. त्यामुळे काही मतदार त्रासून मतदान न करता घरी परतले. ३ वाजतानंतरही या केंद्रावर मतदानाची रांग कायम होती. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराप्रति या केंद्रावरील अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली. विसापूर न. प. शाळेच्या केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट अतिशय संथगतीने काम करीत असल्याने या केंद्रावर सायंकाळी ५ वाजतानंतरही मतदारांची रांग होती. येथे ५.३० वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली.अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील मतदान केंद्रावर एकूण १ हजार ९३ मतदारांपैकी ८२४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ४१५ पुरूष व ४०९ महिला मतदारांचा समावेश आहे. या केंद्रावर ७५.३९ टक्के मतदान झाले.अहेरी येथील १४३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ३७ टक्के तर केंद्र क्रमांक १४२ वर ३४.६६ टक्के मतदान झाले.गुड्डीगुडम येथील केंद्र क्रमांक १६१ वर एकूण ८२७ मतदार होते. त्यापैकी ६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३२५ पुरूष व ३११ महिला मतदारांचा समावेश आहे. या ठिकाणी नवीन मतदारांनी उत्साहात मतदान केले.पेरमिली परिसरात एकूण ११ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. सदर अकराही मतदान केंद्र अतिसंवेदनशील भागात होते. तरीसुद्धा मतदारांनी येथे चांगला प्रतिसाद दिला. पेरमिली येथील बुथ क्रमांक १ वर ७४.८ टक्के, पेरमिली केंद्र क्रमांक २ वर ७५.६६ टक्के, कोरेली बू. केंद्रावर ६८.१२ टक्के, येरमनार येथील केंद्रावर ७२.५१ टक्के, कोडसेपल्ली केंद्रावर ६२.८१ टक्के, चंद्रा येथील केंद्रावर ७९.८६ टक्के, पल्ले येथील केंद्रावर ५७.५६ टक्के, कुरूमपल्ली ६४.५१ टक्के, मेडपल्ली ७८.६४ टक्के, गुर्जा बू. ७६.८४ टक्के व चौडमपल्ली येथील केंद्रावर ७२.१९ टक्के मतदान झाले. सर्व केंद्रावर शांततेत मतदान पार पडले.चामोर्शी तालुक्याच्या आष्टी येथे पाच केंद्र ठेवण्यात आले होते. या सर्व केंद्रावर मिळून एकूण ५ हजार ७६७ मतदारांपैकी ३ हजार ३०७ मतदारांनी मतदान केले. केंद्र क्रमांक ३२५ वर १ हजार २०८ पैकी ६९४ मतदारांनी मतदान केले. येथील टक्केवारी ५७.४५ आहे. केंद्र क्रमांक ३२६ वर १ हजार २६५ पैकी ७८१ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ६१.७३ आहे. केंद्र क्रमांक ३२७ मध्ये १ हजार ३६९ पैकी ७४१ जणांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५५.८८ आहे. केंद्र क्रमांक ३२८ मध्ये १ हजार ८० पैकी ५९१ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ५५ आहे. केंद्र क्रमांक ३२९ केंद्रावर ८४५ पैकी ५०० जणांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ५९ आहे.महागाव येथील केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात ६७.७३ टक्के मतदान झाले.सिरोंचा तालुक्याच्या पातागुडम येथील केंद्रावर ७३.९४ टक्के, कोर्लाच्या केंद्रावर ७२.१६ टक्के व रमेशगुडम केंद्रावर ७२.१६ टक्के मतदान झाले. सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात मतदानामध्ये उत्साह दिसून आला.सिरोंचात यादीत नाव नसल्याने काही मतदारांनी धरला घरचा रस्तासिरोंचा नगर पंचायतीच्या हद्दीत सिरोंचा रै. येथे पाच व सिरोंचा माल येथे दोन असे एकूण सात मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. सातपैकी केंद्र क्रमांक २५६, २५८, २५० व २५१ या चार केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आल्यामुळे मतदान प्रक्रिया संथगतीने पार पडली. प्रचंड विलंब होत असल्याचे पाहून शहरातील काही मतदार मतदान न करता घरी परत गेले. मतदारांमध्ये उत्साह असूनही प्रक्रियेला वेळ लागला.केंद्र क्रमांक २५६ मधील ईव्हीएम अतिशय संथगतीने काम करीत असल्याचा आरोप या केंद्रावरील मतदारांनी केला. येथील मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. मतदान केंद्र परिसरात अपुरी पेंडाल व्यवस्था असल्याने बºयाच मतदारांना उन्हाचे चटके सहन करीत मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक केंद्रांवर दुपारी ३ वाजतानंतरही रांगा कायम होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019