शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 22:28 IST

यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे.

ठळक मुद्देतांदळाचाही पुरवठा नाही : साहित्य खरेदीचे वांदे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे. तात्पुरत्या स्वरूपात शाळांच्या मुख्याध्यापकांनी पोषण आहाराचा खर्च करावा अशी सूचना शिक्षण संचालकांनी केली असली तरी एवढ्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्य झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घराची वाट धरावी लागत आहे.जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून १७८७ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत १ लाख १९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वर्ग १ ते ५ चे ६३ हजार ६५५ तर वर्ग ६ ते ८ चे ३६ हजार ५४१ विद्यार्थी आहेत. प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे. पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडे विचारणा केली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात पोषण आहारासंदर्भातील एक याचिका निकाली निघायची असल्यामुळे यावर्षीच्या शालेय सत्राकरिता निविदा प्रक्रियेला उशिर होत असल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत शाळांच्या मुख्याध्यापकांनीच विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था करावी असे सूचविले. मात्र एवढ्या संख्येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्यप्राय झाले आहे. परिणामी मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे. जुन्या कंत्राटदाराने १६ जूनपर्यंत पुरविलेला साठा जुलै-आॅगस्टपर्यंत पुरला. पण आता दोन महिन्यांपासून पोषण आहाराचे वांदे सुरू आहेत.तांदूळ पुरवठ्याचेही गौडबंगालगेल्यावर्षीपासून तांदळाचा पुरवठा कंत्राटदाराकडून न करता वडसा येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून केला जात आहे. यावर्षीही गेल्यावर्षीच्या वाहतूकदाराला तांदळाचा पुरवठा करण्यास सांगितले. परंतू श्रीहरी राईस अ‍ॅग्रो लि.गोंदिया या वाहतूकदाराने केवळ जुलै-आॅगस्ट महिन्यातच तांदूळ पुरविले. नंतर तांदूळही पोहोचले नाही. त्यामुळे हे तांदूळ कुठे गायब झाले? असा प्रश्न अनेक शाळांना पडला आहे.काही मुख्याध्यापक उसनवारीवर साहित्य आणत आहेत. पण पटसंख्या जास्त असल्यामुळे इतके दिवस उधारी ठेवणे कठीण झाले आहे. तांदळाचा पुरवठा आम्ही करू, बाकीचे साहित्य तुम्ही खरेदी करून नंतर बिल सादर करा असे सांगितले होते. पण दोन महिन्यांत अनेक ठिकाणी तांदूळही पुरवठा केला नाही. त्यामुळे पोषण आहार देणे कठीण झाले आहे.- संजय नार्लावर, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ