शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन परीक्षा पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:13 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही.

ठळक मुद्दे प्रशासनाकडे निवेदन : कौशल्य विकास मंत्र्यांकडे मागणी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर सैद्धांतिक परीक्षा ओएमआर सिटचा वापर करून ५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. परंतु याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. या परीक्षेच्या स्वरूपाबाबत प्रशिक्षणार्थी अनभिज्ञ आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेबाबत अचानक निर्णय आल्याने प्रशिक्षणार्थी भयभित झाले आहेत. पूर्व सूचना न देता व पूर्व तयारी न करता शेवटच्या क्षणी सेमिस्टरच्या आॅनलाईन परीक्षा पद्धतीमुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आयटीआय अंतर्गत अनेक प्रशिक्षणार्थी दहावी उत्तीर्ण असतात तर काही प्रशिक्षणार्थी दहावी अनुत्तीर्ण असतात. त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असेलच असे नाही. संगणकाचे ज्ञान असेल तरीसुद्धा एकाएकी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर आॅनलाईन परीक्षा थोपविण्याचे काम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. त्यामुळे आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून आॅनलाई परीक्षा बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. निवेदन देताना आयटीव्हीओ कार्यकर्ते विनोद मडावी, अंकूश कोकोडे, अधिर गेडाम, पीतांबर हरो, शरद वेलादी, राहूल पेंदाम, सावन चिकराम, शेषराव गावडे, रत्नमाला आत्राम, शीतल पेंदाम, स्वाती कोडाप, पूजा उईके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परीक्षा धोरणात विसंगतीचा आरोपएकाच व्यवसायाच्या सेमिस्टरच्या प्रशिक्षणार्थ्यांची परीक्षा जिल्हा केंद्रावर आॅनलाईन पद्धतीने व तालुका केंद्रावर ओएमआर शिटचा वापर करून आॅफलाईन पद्धतीने घेणे हे धोरण विसंगत व समान न्याय व्यवस्थेत भेदभावपूर्ण असल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा स्वरूपात बदल करीत असताना तज्ज्ञ समिती नेमून प्रशिक्षणार्थ्यांचा शैक्षणिक स्तर, प्रशिक्षणार्थ्यांस स्तर पारदर्शकता आदी बाबींचा विचार करून परीक्षा द्यावी, आॅनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.